EPFO : या महिन्यापासून ATM ने PF काढता येणार,असे काम करणार EPFO 3.0
EPFO लवकरच एटीएम आणि युपीआयद्वारे पीएफ काढण्याची सुविधा सुरु करणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत क्लेम प्रोसेस वेगवान आणि पेपरलेस होणार आहे. यामुळे कोट्यवधी खातेधारकांचा फायदा होणार आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे EPFO लवकरच आपल्या कोट्यवधी खातेधारकांसाठी मोठी सुविधा सुरु करत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफचा पैसा ATM आणि UPI द्वारे काढण्याची सुविधा सुरु होत आहे. या निर्णयामुळे 7.8 कोटी खातेधारकांना कोणत्याही कागदी कारवाई शिवाय लगेच पैसे काढता येणे शक्य होणार आहे.
EPFO 3.0 ने बदलणार PF काढण्याची पद्धत
नवीन सुविधा ही EPFO 3.0 प्रोजेक्टचा भाग आहे. याचा हेतू PF संबंधीत संपूर्ण प्रक्रियेला सोपा, वेगवान आणि संपूर्ण डिजिटल बनवण्यात येणार आहे. असे म्हटले जात आहे की 2026 च्या मध्यापर्यंत ही सिस्टीम संपूर्णपणे लागू होणार आहे.यानंतर PF क्लेम, अकाऊंट ट्रान्सफर आणि पैसे काढण्यासारखी सुविधा आधीपेक्षा खूपच सोपी होणार आहे.
इतक्या दिवसात मिळणार पैसे
EPFO 3.0 च्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचे क्लेम ऑटोमेटिक पद्धतीने सेटल केले जातील. यात क्लेम प्रोसेसची वेळ 10 ते 20 दिवसांपासून घटून केवळ 2 ते 5 दिवसांत होऊ शकते. आधारकार्डने व्हेरिफाईड अकाऊंटसाठी पासबुक वा चेकची फोटो अपलोड करण्याची गरज देखील पडणार नाही. संपूर्ण प्रोसेस पेपरलेस होईल.
ATM आणि UPI ने कसा निघणार PF चा पैसा?
नवीन व्यवस्थेत EPFO त्यांच्या सदस्यांना एक खास ATM कार्ड देणार आहेत. जे थेट त्यांच्या PF अकाऊंटशी लिंक होणार आहे. या कार्डच्या मदतीने युजर ATM मशीन कॅश काढू शकणार आहेत. तसेच PhonePe, Google Pay आणि UPI सारख्या APP द्वारे देखील पीएफचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ एक लाख रुपये काढण्याची सुविधा मिळणार आहे.
नोकरी बदलल्यानंतर पीएफ आपोआप ट्रान्सफर
EPFO 3.0 मध्ये नोकरी बदलणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. आता जुन्या एम्प्लॉयरपासून नव्या एम्प्लॉयरकडे PF बॅलन्स ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार आहे.यासाठी वारंवार कंपनीकडे खेटे मारण्याची गरज नाही.
कोणत्या लोकांना मिळेल सुविधा?
ATM आणि UPI ने PF काढण्याच्या सुविधेसाठी काही अटी असणार आहे. सदस्याचे UAN एक्टिव्ह असायला हवे आणि ते आधार, PAN आणि बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. जर कोणत्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली तर तो एक महिन्यानंतर आपल्या पीएफच्या 75 टक्के रक्कम काढू शकतो. उर्वरित 25 टक्के रक्कम दोन महिन्यानंतर काढता येऊ शकणार आहे.
PF मधून जास्त पैसे काढणे किती योग्य ?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की PF रिटायरमेंटसाठी सर्वात महत्वाची बचत असते. यात मिळणारे चक्रवाढ व्याज दीर्घकाळात मोठा फंड तयार करते. त्यामुळे अत्यंत गरज असेल तेव्हाच ही रक्कम काढणे योग्य आहे.
PF काढण्यावर टॅक्सचे नियम
जर कर्मचाऱ्यांनी एकूण मिळून 5 वर्षांची नोकरी पूर्ण केली असेल तर पीएफ काढण्यावर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. हा कालावधी एक वा एकाहून अधिक कंपन्यांचा मिळून पूर्ण केला जाऊ शकतो.