AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!

EPFO withdrawal rules: आता अचानक पैशांची गरज पडल्यास पीएफचा पैसा (PF Withdrawal Rules) हाती असेल. त्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. EPFO 3.0 तुमच्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!
ईपीएफओ, पीएफ, युपीआयImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 2:15 PM
Share

EPFO withdrawal rules: केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO Withdrawal Rules) मोठी अपडेट समोर आली आहे. युपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढता येईल. त्यासाठी EPFO 3.0 हे नवीन व्हर्जन समोर येत आहे. कर्मचारी लवकरच युपीआयच्या माध्यमातून पीएफची रक्कम (UPI Based PF Withdrawal) लवकरच काढू शकतील. त्यासाठी काही नियम आहेत. ही सेवा एक वर्षापासून सुरू होण्याची प्रतिक्षा आहे. तांत्रिक बाबी आणि काही अत्यावश्यक चाचणी झाल्यानंतर ही सेवा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

UPI मधून कशी काढणार रक्कम?

ईपीएफच्या सदस्यांना केवळ एटीएमच नाही तर UPI च्या माध्यमातून पीएफ काढता येईल. कर्मचारी Paytm, GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम काढू शकतील. ही रक्कम त्यांच्या लिंक्ड बँक खात्यात पीएफची रक्कम जमा होईल. या ऑनलाईन ॲपवर काही दिवसात ‘EPFO Withdrawal’ असा पर्याय मिळेल. त्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

सध्या हा पर्याय उपलब्ध केलेला नाही. हा पर्याय समोर आल्यानंतर या पर्यायामध्ये ईपीएफओ सदस्यांना UAN क्रमांक नोंदवावा लागेल. तर किती रक्कम काढायची, ती रक्कम नोंदवावी लागेल. तसेच ही रक्कम कोणत्या कारणासाठी वापरावी लागणार आहे, ते कारणही द्यावे लागेल. वैद्यकीय गरज, घराचे बांधकाम, लग्न वा इतर खर्चासाठी नियमानुसार ही रक्कम काढता येईल.

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. OTP टाकल्यावर पीएफचा पैसा लागलीच त्यांच्या बँक खात्यातजमा होईल. डिजिटल खात्यात सुद्धा ही रक्कम जमा होईल. डिजिटल वॉलेटमध्ये रक्कम दिसेल. तिथून ही रक्कम बँक खात्यात जमा करता येईल.

EPFO 3.0: आता कोणेतही पेपरवर्क नाही

EPFO आता संपूर्ण सिस्टिम अपडेट करत आहे. त्यातंर्गत सर्वात मोठा बदल होईल. पीएफ रक्कम काढण्यासाठी आता कोणतीही कागदी घोडे नाचवावे लागणार नाही. सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करेल. त्याआधारे कर्मचारी त्यांच्या UPI आयडीच्या माध्यमातून पैसे काढू शकतील.

Follow Us
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...