
UPI Payment : तुमची मुलं दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी असतील. अथवा बाजारात, बाहेर त्यांना ऑनलाईन पेमेंटची गरज असेल तर, आता त्यांच्यासाठी आता एक खास फीचर आले आहे. त्यांना कोणत्याही बँक खात्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. RBI ने Junio Payments प्रायव्हेट लिमिटेडला डिजिटल वॉलेट सेवा देण्याची परवानगी दिली आहे. हे ॲप मुलांना UPI पेमेंट करण्याची सुविधा देईल. हे वॉलेट पालकांच्या खात्याशी लिंक होईल. QR कोड स्कॅन करून त्यांना ऑनलाईन खरेदी करता येईल. ऑनलाईन पेमेंट करता येईल. मुलांना आर्थिक सजगता येण्यासाठी आणि जबाबदारीचे भान येण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
बँक खातं नसतानाही पेमेंट शक्य
डिजिटल पेमेंटमध्ये भारताने मोठी आघाडी घेतली आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोक ऑनलाईन पेमेंटचा मार्ग अवलंबित आहेत. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सुलभ आणि सहज झाला आहे. पण या सेवेसाठी बँक खाते अनिवार्य असते. पण आता RBIच्या नवीन प्रयोगामध्ये बँक खातं नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य होईल.
मुलंही करू शकतील पेमेंट
Junio Payments प्रायव्हेट लिमिटेडला RBI ने डिजिटल वॉलेट सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या नवीन वॉलेटद्वारे मुलांना बँक खात्याचा वापर न करता UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येईल. ही सुविधा NPCI च्या UPI सर्कलच्या माध्यमातून मिळेल. यामध्ये पालकांचे UPI खाते मुलांच्या वॉलेटशी लिंक होईल.
या सेवेचा उद्देश काय?
Junio Payments चा उद्देश केवळ पेमेंटची सुविधा देणे नाही. तर मुले आणि तरुणांमध्ये आर्थिक समज वाढवण्यात येईल. अंकित गेरा आणि शंकर नाथ या दोघांनी हे अॅप सुरु केले आहे. यामुळे मुलं जबाबदारीने खर्च करतील. त्यांना खर्चाचा आणि कमाईचा ताळेबंद कळेल. तर मुलांना बचतीची सवय लावण्यासाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म मदत करेल. तर पालकांना या अॅपमध्ये पैसे ट्रान्सफर करता येईल. खर्चाची मर्यादा ठरवता येईल. प्रत्येक व्यवहार नजरेखालून घालता येईल.
जुनिओ ॲपमध्ये टास्क रिवॉर्ड आणि बचतीचे साध्य यासारख्या सुविधा उपलब्ध आहे. यामुळे मुले बचत आणि खर्च यातील फायदे समजून घेतील. पैसे कसे वाचवायचे, खर्च कसा नियंत्रीत ठेवायचा, लहान वयात अर्थभान आणण्यासाठी हे ॲप त्यांना मदत करेल. आतापर्यंत दोन दशलक्षाहून अधिक तरुणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
जुनिओ वॉलेट असे काम करते
पालक UPI खाते मुलांच्या वॉलेटशी लिंक करतील.
मुले QR कोड स्कॅन करतील. कोणत्याही दुकानात अथवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पेमेंट करतील
खर्चाची मर्यादा आधीच निश्चित असल्यामुळे मुले गरजेपेक्षा जास्त खर्च करणार नाहीत
ॲपमध्ये प्रत्येक व्यवहाराचा रेकॉर्ड उपलब्ध असेल, पालकांना व्यवहार तपासता येईल