Explainer | आता वारंवार नाही पटवून द्यावी लागणार तुमची ओळख, Uniform KYC संपवेल झंझट

| Updated on: Mar 14, 2024 | 4:41 PM

Explainer | होऊ शकतं देशात लवकरच तुम्हाला एकदाच तुमची ओळख पटवून द्यावी लागेल. धक्का बसला ना! कारण कोणतेही सरकारी काम असो वा बँक, विमा, म्युच्युअल फंड, शेअर बाजार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओळख पटवून द्यावी लागते. त्यासाठी कित्येकदा फोटोकॉपी काढाव्या लागतात.

Explainer | आता वारंवार नाही पटवून द्यावी लागणार तुमची ओळख, Uniform KYC संपवेल झंझट
Follow us on

नवी दिल्ली | 14 March 2024 : आधार कार्ड भारतीयांचा आधार झाला आणि तेव्हापासून केवळ मोबाईल क्रमांकाआधारे युपीआय एपच्या माध्यमातून व्यवहार करणे, बँकेत खाते उघडणे अत्यंत सोपे झाले. काही शेअर ब्रोकर संस्था सुद्धा डीमॅटसाठी हाच फॉर्म्युला वापरतात. पण अजूनही एक समस्या वारंवार सतावते, ती म्हणजे आपल्या प्रत्येकाला स्वतःची ओळख पटवून द्यावी लागते. मग बँकेत खाते उघडणे असो, डिमॅट खाते, विमा काढणे, इतर शासकीय कामे यासाठी केवायसी करताना सर्वच कागदपत्रांची उजळणी ठरलेली असते. त्यासाठीच्या फोटोकॉपीवर मोठा खर्च होतो. त्यावर एक जालीम उपाय येण्याची दाट शक्यता आहे. सरकार लवकरच या झंझटीतून नागरिकांची सूटका करणार आहे.

एकदाच पटवा ओळख

कदाचित देशात तुम्हाला एकदाच ओळख पटवून द्यावी लागू शकते. केंद्र सरकार यावर काम करत आहे. तुमची माहिती एका केंद्रीय यंत्रणेकडे जतन करण्यात येईल. त्याच ठिकाणाहून ही माहिती तुमच्या नावाच्या आधारे शोधण्यात येईल. प्रत्येक यंत्रणा, संस्थेला हा डाटा पुरविण्यात येईल. बँकेत खाते उघडण्यासाठी, विमा काढते वेळी अथवा इतर महत्वपूर्ण कामासाठी तुमची हीच माहिती उपयोगी पडेल. त्यामुळे वारंवार तुमच्याकडून केवायसीसाठी कागदपत्रे घेण्यात येणार नाहीत. त्यासाठीच केंद्र सरकार युनिफॉर्म केवायसी वा सिंगल केवायसी पद्धत लागू करण्याच्या विचारात आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे Uniform KYC

  • आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने (FSDC) याविषयीचा प्रस्ताव दिला आहे.
  • संपूर्ण आर्थिक क्षेत्रासाठी एकच कायम पद्धत लागू करण्याची शिफारस
  • लोकांची संपूर्ण माहिती जमा करायची. आधार, पॅन आणि इतर महत्वाची कागदपत्रांचा समावेश
  • त्याआधारे विविध संस्थांना ही माहिती पुरवायची, अर्थात ग्राहकाच्या परवानगीनेच ही प्रक्रिया
  • केवायसी प्रक्रिया संपूर्णतः कागदविरहीत करण्याचा प्रयत्न, पेपरलेस प्रणाली विकसीत होईल
  • केवायसी प्रक्रिया झटपट होईल. कागदपत्रे, अनावश्यक फाईलींचा बोजा कमी होईल
  • अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समितीची यासाठी स्थापना

ही व्यवस्था कशी करेल काम

  1. युनिफॉर्म केवायसी अथवा सिंगल केवायसी सध्या काही क्षेत्रात उपयोगी पडत आहे. शेअर बाजारात सेबीकडे एकदा तुमची केवायसी झाल्यावर तुम्हाला वारंवार प्रत्येक सेगमेंट्ससाठी केवायसी पूर्ण करण्यची गरज नाही. त्यामुळेच अनेक ब्रोकर्स आता अवघ्या काही मिनिटात तुमचे डिमॅट खाते उघडतात. त्यातून तुम्हाला शेअर, म्युच्युअल फंड, एफडीच्या सुविधा देतात. सेबीकडे माहिती जतन असल्याने ही पद्धत सोपी ठरली आहे. आता हीच कार्यप्रणाली सर्वत्र वापरण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी ही समिती शिफारसी करेल.
  2. सध्या बँका, विमा वा इतर सरकारी यंत्रणेत ई-केवायसीचा वापर वाढला आहे. 2016 मध्ये त्यासाठी सेंट्रल केवायसी रिकॉर्ड्स रजिस्ट्रीने (CKYCR) केवायसी प्रक्रियेचे केंद्रीकरण केले. पण यामध्ये अंतर्गत देवाण-घेवाणीची (इंटर-ऑपरेबिलिटी) मोठी कमतरता आता जाणवू लागली आहे. ही त्रुटी दूर झाल्यास वित्त संस्था, बँका, विमा कंपन्या, शासकीय संस्थांसह ग्राहकांचा सर्वात मोठा फायदा होईल. ऑनलाईन फ्रॉडचे धोके ओळखून त्यात सुरक्षेची तजवीज केल्यास मोठा दिलासा मिळेल.
  3. तर या प्रक्रियेत तुमच्याकडील सर्व कागदपत्रे एकदाच जमा करुन घेण्यात येतील. डीजी लॉकरमध्ये असा काहीसा प्रयोग झाला आहे. पण तो मर्यादीत आहे. सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर ग्राहकांना एक CKYCR Identification Number देण्यात येईल. हा 14 अंकांचा क्रमांकच तुमची ओळख असेल. बँक खाते, विमा खरेदी, डिमॅट खाते वा इतर कामासाठी हा क्रमांक जमा केल्यावर झटपट काम होईल.