AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : एक लिटरसाठी खिशाला इतकी झळ, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today : रविवारी दुपार होण्यापूर्वीच फिरण्याचा मूड असेल तर पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या...आज कोणत्या शहरात झाले महाग आणि कुठे मिळतंय स्वस्त इंधन...

Petrol Diesel Price Today :  एक लिटरसाठी खिशाला इतकी झळ, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
आजचा भाव काय
| Updated on: May 14, 2023 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली : पारा चढण्यापूर्वी रविवारी सकाळीच जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या. जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil) सातत्याने चढउतार सुरु आहे. आज कच्चा तेलाचे दर वधारले नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. पण हा दिलासा कोट्यवधी ग्राहकांपर्यंत कधी पोहचेल हा प्रश्न आहे. गेल्या एका वर्षांपासून पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) मिळूनही त्याचा कणभर ही फायदा ग्राहकांना मिळालेला नाही. आता कर्नाटक पराभवानंतर आता भावात कपात होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण छत्तीसगड आणि मध्यप्रदेशसह लोकसभेच्या निवडणुका टप्प्यात आहेत.

कच्चा तेलाची किंमत आज 13 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 70.04 डॉलर प्रति बॅरलवर झाले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 74.17 डॉलर प्रति बॅरल झाले. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजताच इंधनाचे दर जाहीर केले. त्यानुसार, तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या. राज्यात रायगडसह ठाण्यामध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

इंधन होईल स्वस्त सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.

जून महिन्यात पहिली कपात कर्नाटकी रागाने काँग्रेसचं कम बँक झाले आहे तर भाजपचा पराभव झाला आहे. या नाट्यमय घडामोडींचा परिणाम सर्वच स्तरावर आता दिसून येईल. पुढच्या टप्प्यात 4 राज्यातील निवडणूका होत आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. आता इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

मोठा बदल नाही केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.