AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिस्किट असो कुरकुरे… साबण वा डिटर्जंट… महागाई तुमचा खिसा पोखरणार… काय काय महागणार?

FMCG Products Inflation: गॅस दरवाढीपाठोपाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीची भीती व्यक्त होत आहे. तर आता दैनंदिन वापरातील अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. बिस्किट, चॉकलेटपासून ते साबण आणि इतर उत्पादनांसाठी सामान्यांना अधिक किंमत मोजावी लागेल.

बिस्किट असो कुरकुरे... साबण वा डिटर्जंट... महागाई तुमचा खिसा पोखरणार... काय काय महागणार?
महागाई तुमचा खिसा पोखरणार... काय काय महागणार? Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 12, 2026 | 9:33 AM
Share

FMCG Products Price Hike: साबण असो वा डिटर्जंट, बिस्किट, चॉकलेट, पॅकेज्ड फूड आयटम्स, कोल्ड्रिंक्स महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2022 नंतर पुन्हा महागाईचा मोठा वार होण्याची शक्यता आहे. गॅस दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीती असतानाच चोर पावलांनी आता दैनंदिन वापराच्या वस्तूंना पण महागाईचा मुलामा लागणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला आता जगण्यासाठीच सर्वात मोठा संघर्ष करावा लागेल. त्यांच्या आयुष्यात हौसमौजेचे दिवस अजून घटणार आहे. पेट्रोल- डिझेलचा तुटवडा, त्यातच किंमती वाढण्याची शक्यता, उत्पादन खर्चही न निघण्याची भीती यामुळे आता FMCG (Fast Moving Consumer Goods) कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्चा माल महागल्याने आणि इंधन दरवाढीमुळे आता अनेक वस्तू महागण्याची अथवा त्या वस्तूंचा आकार आणि वजन कमी होण्याची शक्यता आहे.

FMCG कंपन्यांसमोर मोठे आव्हान

कच्च्या तेलेचा्या किंमतीतील चढउतार, लॉजिस्टिक्सचा वाढता खर्च, आयात वस्तूंची महागाई, भूराजकीय तणावाचा फटका यामुळे एफएमसीजी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. फूड, पर्सनल केअर, बिव्हरेज, घरगुती खाद्यपदार्थ उत्पादनं करणाऱ्या कंपन्यांसमोर बाजारात टिकून राहण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जागतिक आणि घरगुती पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कंपन्या दबावात आल्या आहेत.

नफा आणि खर्च यांच्यातील कसरत करावी लागत असल्याने किंमती वाढवण्याशिवाय या कंपन्यांसमोर आता पर्याय उरलेला नाही. कंपन्यांनी महागाईतही पाकिट, उत्पादन वजन आणि आकारात कपात करत किंमती न वाढवण्याचा पर्याय मध्यंतरी अवलंबला होता. त्यामुळे बाजारात या कंपन्या टिकून राहिल्या. बाजारातील विक्रीवर परिणाम न होऊ देता दरवाढ करण्याचा पर्याय कंपन्यांसमोर आहे. 5, 10 वा 15 रुपयांच्या छोट्या पॅकेटवर त्याचा परिणाम दिसू शकतो.

काय काय वस्तू महागणार?

साबण, डिटर्जंट यामध्ये पाम ऑईल आणि लिनिअर अल्काईल बेंजीन याचा वापर होतो. जागतिक बाजारात या दोन्हींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

डिश वॉश आणि हँडवॉश यांचे पॅकेजिंग आणि पुरवठा खर्च वाढला आहे. त्यामुळे किंमतीत 5-10 टक्क्यांची वाढ होणार आहे.

बिस्किट आणि नमकीन – पीठ, साखर आणि पाम ऑईल यांच्या किंमतीत वाढ होईल. बिस्किट आणि नमकीन तयार करणाऱ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. कंपन्या एकतर भाव वाढ करेल अथवा पाकिटातील खाद्यपदार्थांचे वजन कमी करण्यात येईल.

पॅकेज्ड फूड – फ्रोझन फूड आणि इन्स्टंट नूडल्सच्या भावात वाढ होईल.

सॉफ्ट ड्रिंक्स – सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स आणि इतर पेय पदार्थांच्या किंमती वाढण्याची अथवा त्यातील द्रव पदार्थांचे वजन कमी होणार आहे.

चहा-कॉफी- लॉजिस्टिक्स खर्च वाढल्याने चहा आणि कॉफीची दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?