Gautam Adani : आश्चर्याचा धक्का! एलन मस्क,अंबानी यांना मागे टाकून, अदानी फोर्ब्सच्या यादीत टॉपर, संपत्ती वाढीचा बुलेट स्पीड

Gautam Adani : गौतम अदानी यांनी पुन्हा अब्जाधीशांच्या यादीत मुसंडी मारली आहे. बुलेट स्पीडने त्यांची संपत्ती वाढली आहे. त्यांनी मुकेश अंबानी यांनाच नाही तर एलॉन मस्क यांनाही मागे टाकेल आहे.

Gautam Adani : आश्चर्याचा धक्का! एलन मस्क,अंबानी यांना मागे टाकून, अदानी फोर्ब्सच्या यादीत टॉपर, संपत्ती वाढीचा बुलेट स्पीड
जोरदार कमबॅक
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:06 AM

नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) अहवालानंतर, अदानी समूहाला (Adani Group) मोठा झटका बसला. हिंडनबर्ग यांच्या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले. खात्यात हेराफेरी, कंपन्यांमध्ये अनियमितता, शेअरचे जादा किंमत असे गंभीर आरोप हिंडनबर्ग अहवालात करण्यात आले होते. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरला जबरदस्त तडाखा बसला. कंपान्यांचे शेअर धडाधड खाली आहे. काही शेअर अर्ध्यावर येऊन ठेपले. 10 दिवसात कंपनीचे बाजारातील भांडवल 100 अब्ज डॉलरपर्यंत गडगडले. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. 2023 मधील सुरुवातीच्या आठवड्यात त्यांची संपत्ती 130 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. पण त्यांना या अहवालाचा मोठा झटका बसला. त्यांची संपत्ती 10 दिवसांत घसरुन 58 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनियर्स यादीत (Forbes Real Time billionaires list) अदानी यांचा नंबर दोन वरुन थेट 22 व्या क्रमांक फेकले गेले. परंतु, अदानी यांनी जबरदस्त कमबॅक केले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीचा आलेख पुन्हा वाढला आहे. बुधवारी फोर्ब्सच्या नव्या यादीत ते टॉपर ठरले.

जगभरातील श्रीमंतांच्या संपत्ती आधारे फोर्ब्स त्यांना हे रँकिंग देते. फोर्ब्सने या यादीत बुधवारी अदानी यांना टॉपर गेनर म्हणून स्थान दिले. काल म्हणजे बुधवारी, 8 फेब्रुवारी रोजी जगातील सर्वात जास्त कमाई गौतम अदानी यांनी केली. एकाच दिवसात त्यांच्या अनेक खात्यात संपत्ती जमा झाली.

बुधवारी गौतम अदानी यांनी 24 तासात 4.3 अब्ज डॉलरची कमाई केली. त्यांच्या एकूण संपत्तीत 4.3 अब्ज डॉलरची भर पडली. त्यांची एकूण संपत्ती आता 64.9 अब्ज डॉलर झाली आहे. अदानी यांच्यासह या विनर यादीत एलॉन मस्क (Elon Musk) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर Klaus-Michael Kuehne हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

हे सुद्धा वाचा

Klaus-Michael Kuehne यांच्या संपत्तीत एकूण 1.9 अब्ज डॉलरची भर पडली. या यादीत रिलायन्सन इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी बाजी मारली. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत 1.6 अब्ज डॉलरची भर पडली. फोर्ब्सच्या या यादीत संपत्ती गमाविणाऱ्यांचे ही नाव आहे. यामध्ये लेरी पेज यांनी सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. काल त्यांना 6.4 अब्ज डॉलरचा फटका बसला.

गेल्या वर्षी 2022 मध्ये जगात सर्वात वेगाने त्यांची संपत्ती वाढत होती. त्यांनी झपाट्याने सर्व पायऱ्या पार करत तिसरे स्थान पटकावले. तेव्हा जगातील श्रीमंतांच्या भुवया वर झाल्या होत्या. पण या अहवालाने त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. मागील 10 दिवसांत त्यांनी 52 अब्ज डॉलर गमावले होते.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.