आयपीएलमधील ही टीम खरेदी करण्याचा अदानींकडून दुसऱ्यांदा प्रयत्न, पण या कंपनीनेच मारली बाजी

gautam adani: गुजरात टायटन्सचे मूल्य अंदाजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. गुजरात टायटन्सची मोठी किंमत लक्षात घेऊन अदानी समूह त्यापासून बाहेर पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अदानी समूहाने आपले लक्ष मुख्य व्यवसाय असणारे वीज आणि बंदरे यावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमधील ही टीम खरेदी करण्याचा अदानींकडून दुसऱ्यांदा प्रयत्न, पण या कंपनीनेच मारली बाजी
gujarat titans Gautam Adani
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 4:44 PM

ipl franchise gujarat titans: देशातील श्रीमंत उद्योगपती यांनी विविध क्षेत्रात आपल्या उद्योगाचे साम्राज्य उभारले आहे. मुकेश अंबानी यांच्याप्रमाणे आयपीएलची फ्रँचायझी घेऊन क्रीडा क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न गौतम अदानी यांचा आहे. परंतु त्यात त्यांना अजूनही यश येत नाही. आयपीएल फ्रँचायझी घेण्याची संधी गौतम अदान यांची दुसऱ्यांदा हुकली आहे. अदानी समूहाची नजर आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सवर होती. पण अहमदाबादच्या टोरेंट ग्रुपने बाजी मारली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्समधील बहुतांश भागभांडवल खरेदी करण्यासाठी युरोपियन प्रायव्हेट इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्ससोबत करार केला आहे.

टोरेंट ग्रुपकडे फ्रँचायझीचा सर्वाधिक भाग

फेब्रुवारी 2025 मध्ये लॉक-इन कालावधी संपल्यानंतर टोरेंट ग्रुपचे गुजरात टायटन्सवर नियंत्रण असणार आहे. त्यामुळे अदानी ग्रुप पुन्हा एकदा आयपीएल घेण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जूनमध्ये अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक हौलिहान लोकेने आयपीएलचे मूल्य $16.4 अब्ज केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेंट आणि सीव्हीसीने गुजरात टायटन्ससाठी करार केला आहे. लॉक-इन कालावधी संपल्यानंतरच औपचारिक करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. टोरेंट ग्रुपकडे फ्रँचायझीमध्ये बहुसंख्य वाटा असणार आहे. सीव्हीसीकडे कमी भाग असणार आहे.

गुजरात टायटन्सचे मूल्य अंदाजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. गुजरात टायटन्सची मोठी किंमत लक्षात घेऊन अदानी समूह त्यापासून बाहेर पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अदानी समूहाने आपले लक्ष मुख्य व्यवसाय असणारे वीज आणि बंदरे यावर केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी 2021 मध्ये केला प्रयत्न

अदानी आणि टोरेंट या दोघांनी 2021 मध्ये आयपीएलची अहमदाबाद फ्रँचायझी घेण्यासाठी बोली लावली होती. परंतु ते अयशस्वी झाले. अदानी समूह आणि टोरेंटने अनुक्रमे ५,१०० कोटी आणि ४,६५३ कोटी रुपयांची बोली लावली होती. पण सीव्हीसीने ५,६२५ कोटी रुपयांची बोली लावून फ्रऐचाझी घेतली होती. सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स, टोरेंट ग्रुप आणि अदानी ग्रुपने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. पॉवर आणि फार्मा व्यवसाय करणाऱ्या टोरेंट ग्रुपचे एकूण मार्केट कॅप सुमारे 2 लाख कोटी रुपये आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.