Gautam Adani : रॉकेट झाला हा अदानी समूहाचा शेअर, हा करार का आला चर्चेत

Gautam Adani : अदानी समूहावर सध्या संकटांची मालिका सुरु आहे. पण समूहातील हा शेअर रॉकेट झाला आहे. या जागतिक कंपनीशी करार होत असल्याचा दावा करण्यात येत असल्याने शेअर वधारला आहे.

Gautam Adani : रॉकेट झाला हा अदानी समूहाचा शेअर, हा करार का आला चर्चेत
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : देशातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी पुन्हा कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या वर्षांत त्यांच्यावर शनी वक्री झाला आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाच, जानेवारी 2023 पासून त्यांच्यावर संकटं धाऊन येत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर (Hindenburg Report) आणि आता आणखी एका अमेरिकन फर्मच्या आरोपामुळे शेअर बाजारात अदानी समूहातील सर्वच शेअरने मोठा फटका बसला. अदानी समूहावर (Adani Group) या अहवालात गंभीर आरोप लावण्यात आले आहे. देशातील विरोधकांनी पण त्यांना लक्ष्य केले आहे. पण अदानी समूहातील या कंपनीचा शेअर अचानक वधारला. त्याने मोठी भरारी घेतली. या नव्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला आहे. या चर्चावर शिक्कामोर्तब झाल्यास अदानी समूहातील हे दोन शेअर आगेकूच करतील.

फ्रान्सच्या कंपनीशी करार

अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी आणि फ्रान्सची टोटल एनर्जीज SE या दोन कंपन्यांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्पावर चर्चा झाली. त्यात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत फ्रान्सची ही तेल कंपनी अदानी ग्रीन एनर्जीच्या काही प्रकल्पात हिस्सेदारी खरेदी करेल. फ्रान्सची ही कंपनी अदानींच्या कंपनीत 700 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यासाठी परदेशी कंपनीने प्रयत्न सुरु केले आहेत. याविषयीचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी गुंतवणूक

फ्रान्सची कंपनी अदानी समूहातील मोठी गुंतवणूक करणार आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार दोन्ही कंपन्यांमध्ये याविषयीची चर्चा झाली आहे. पण अजून त्याविषयीचा खुलासा झालेला नाही. अदानी समूह आणि फ्रान्सच्या कंपनीने याविषयी कोणती ही माहिती देण्यास नकार दिला. भारताची वाटचाल अक्षय ऊर्जेकडे सुरु आहे. ही डील झाल्यास अंबानी अगोदर अदानी या क्षेत्रात मोठे वाटेकरी ठरु शकतील.

शेअर्सचे कमबॅक

अदानी समूह दोन अमेरिकन फर्मच्या आरोपानंतर, आता कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. या वर्षात समूहावर सातत्याने हल्ले सुरु आहेत. आरोपांच्या फैरी सुरु आहेत. तरीही या कंपनीत इतर अनेक गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला आहे. आरोपानंतर अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले होते. आता त्यात काही वृत्तांमुळे पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे.

शेअरची कामगिरी काय

फ्रान्सच्या कंपनीसोबत करार होणार असल्याची वार्ता शेअर बाजारात येऊन धडकली. शुक्रवारी या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 1000 रुपयांवर पोहचली. हा शेअर गुरुवारी 983.80 रुपयांवर बंद झाला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.