AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम अदानी यांचा एक निर्णय आणि कंपनीसह गुंतवणूकदार झाले मालामाल

Gautam Adani : अदानी समूहाने व्यवसाय वाढीसाठी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या आरोपानंतर आता कंपनी नुकसान भरुन काढत आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी कुटुंबाने अंबुजा सिमेंटमध्ये हिस्सा वाढविण्याची घोषणा केली. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. कंपनीसह गुंतवणूकदार मालामाल झाले.

गौतम अदानी यांचा एक निर्णय आणि कंपनीसह गुंतवणूकदार झाले मालामाल
गौतम अदानी यांची एक खेळी, यांना झाला मोठा फायदा
| Updated on: Mar 28, 2024 | 4:41 PM
Share

अदानी समूहाने अनेक आरोपांना मागे टाकले आहे. गेल्या वर्षी हिंडनबर्गचे भूत समूहाच्या मानगुटीवर बसल्याने मोठा फटका बसला होता. अदानी समूहाचे सर्वच शेअर जमिनीवर आले होते. आता कंपनी हे सर्व नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत आहे. अंबानी कुटुंबियांनी अंबुजा सिमेंटमध्ये हिस्सा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी उसळला. अंबुजा सिमेंटमध्ये अदानी कुटुंबियांनी 6,661 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

काय झाला बदल?

  1. अदानी कुटुंबियांच्या या खरेदीनंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीत त्यांची टक्केवारी 3.6 टक्क्यांपर्यंत वाढून 66.7 टक्के इतकी झाली आहे. गौतम अदानी यांच्या मालकीची कंपनी अंबुजा सिमेंटने या घडामोडींबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या गुंतवणुकीचा फायदा कंपनीला व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी होईल, असे मत कंपनीने मांडले. अंबानी सिमेंट 2028 पर्यंत सिमेंट उत्पादन 14 कोटी टनप्रति वर्ष करण्याच्या तयारीत आहे.
  2. यापूर्वी ऑक्टोबर 2022 संचालक मंडळाने वॉरंट जारी करावे यासाठी प्रवर्तक अदानी कुटुंबाने कंपनीत 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अंबुजा सिमेंट्सकडे एसीसी सिमेंटमध्ये पण मोठा वाटा आहे.

इतका आहे वाटा

  • या नवीन घडामोडींमुळे अदानी कुटुंबियांची कंपनीतील टक्केवारी 3.6 टक्क्यांनी वाढून एकूण 66.7 टक्के इतकी झाली आहे. अंबुजा सिमेंट्सचे सीईओ अजय कपूर यांनी सांगितले की, ही गुंतवणूक कंपनीच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. व्यवसाय वृद्धीसाठी कंपनी काम करत असल्याची ही पावती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  • या घडामोडींमुळे अंबुजा सिमेंटचा शेअर आज तेजीत होता. आज या शेअरमध्ये 1.91 टक्क्यांची तेजी दिसून आली. आज बाजार बंद होताना शेअर 613 रुपयांवर पोहचला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 625 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 354 रुपये अशी आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...