AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत्रा गोळीच्या किंमतीतील शेअरने उघडले नशीब, आता पैसा मोजायला लावलंय मशीन

Multibagger Share : 1 रुपयांचा शेअर आता 28 रुपयांहून पण पुढे धावला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे. चार वर्षात या शेअरने मोठा पल्ला गाठला आहे. गुंतवणूकदारांना या शेअरने चार पट पैसा परत केला आहे. या पेनी स्टॉकने दिग्गज कंपन्यांना परतावा देण्यात मागे टाकले आहे.

संत्रा गोळीच्या किंमतीतील शेअरने उघडले नशीब, आता पैसा मोजायला लावलंय मशीन
या शेअरने केले मालामाल
| Updated on: Mar 27, 2024 | 11:03 AM
Share

पेनी स्टॉकला बाजारात चार आण्याचा स्टॉक म्हणतात. छोट्या गुंतवणूकदारांची हे स्टॉक पहिली पसंती असतात. पेनी शेअरची किंमत 1-2 रुपये अथवा त्यापेक्षा कमी असते. पण त्यापासून मिळणार परतावा जोरदार असतो. काही कंपन्या नेटाने पुढे जातात. छोट्या कंपन्या भविष्यात मोठी मजल मारतात. त्यांचा अगोदरच शेअर गाठीशी असेल तर पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे होतात. लॉयड्स इंटरप्राईजेसच्या शेअरने (Lloyds Enterprises Share) अशीच कामगिरी केली आहे. या शेअरने गेल्या 4 वर्षांत 2000% टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कोरोना काळात हा शेअर अगदी कमी किंमतीत मिळत होता.

असा वधारला शेअर

मार्च 2020 मध्ये लॉयड्स इंटरप्राईजेचा शेअर अवघ्या 1 रुपयांना खरेदी करता येत होता. आता या शेअरचा भाव 28 रुपयांपेक्षा अधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी या शेअरने 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला होता. म्हणजे या स्टॉकने गुंतवणूकदारांना 4 पट रिटर्न दिला आहे. तर या शेअरने या वर्षातही मोठी घौडदौड केली आहे.

कोरोन काळात तर अगदी स्वस्त

कोरोना काळात, मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. तेव्हा हा शेअर 1.20 रुपये किंमतीला होता. त्यानंतर या शेअरने मोठी भरारी घेतली. हा शेअर सूसाट धावला. जर एखाद्या व्यक्तीने चार वर्षांपूर्वी लॉयड्स इंटरप्राईजेचा शेअर खरेदी केला असता तर तो आज मालदार असता. एखाद्याने त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 23 लाख रुपयांहून अधिक असती. तर रिटर्न 46 लाखांहून अधिक असता. हा शेअर गेल्यावर्षी 47.75 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता.

काय करते ही कंपनी

लॉयड्स इंटरप्राईजेस कंपनी आर्यन आणि स्टीलचे उत्पादन करते. या कंपनीला यापूर्वी श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड या नावाने ओळखले जायचे. 2023 मध्ये या कंपनीचे नाव बदलून ते लॉयड्स इंटरप्राईजेस कंपनी करण्यात आले. कंपनी स्टील प्लँट्स आणि इलेक्ट्रिसिटी प्रकल्पासाठी अवजड यंत्राची निर्मिती करते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.