AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Economy : जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात, शेअर बाजारात गुंतवणूक करावी की करु नये?

World Economy : जागतिक अर्थव्यवस्था सध्या धोक्यात आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तुमची गुंतवणूक फायद्याची राहील की धोक्याची..

World Economy : जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात, शेअर बाजारात गुंतवणूक करावी की करु नये?
गुंतवणूक करावी की करु नये Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 07, 2022 | 5:47 PM
Share

नवी दिल्ली : यापूर्वी कोविड 19 (Covid-19) आणि आता महागाई (Inflation), भाववाढ (Rate Hike), कच्च्या तेलाचे वाढीव दर आणि भूराजकीय वादामुळे जगभरातील अर्थव्यवस्था (Global Economy) मेटाकुटीला आल्या आहेत. त्याचा थेट परिणाम या देशांच्या वित्तीय परिस्थितीवर दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही जरा गृहपाठ करावा इतकाच याचा अर्थ आहे..

आतंरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMP) जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असल्याचा दावा केला आहे. तसेच येत्या काही दिवसात, पुढील वर्षापर्यंत जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना दबाव सहन करावा लागणार असल्याचे IMP ने स्पष्ट केले आहे. IMF प्रमुख क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी याविषयीचा इशारा दिला आहे.

IIFL, VP-रिसर्च, अनुज गुप्‍ता यांनी शेअर बाजारावरही याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले. जागतिक रेटिंग संस्था त्यामुळेच प्रत्येक देशातील वृद्धीचा अंदाज कमी करत आहेत. जागतिक बाजार घसरणीचा इशारा देत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने सातत्याने व्याजदर वृद्धी केल्याने तसेच इतर युरोपियन बँकांनीही व्याजदर वाढवल्याने मंदीचा आशंका प्रबळ होत आहे.

सध्या शेअर बाजारावर या सर्व गोष्टींचा परिणाम दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने त्यांच्याकडील शेअरची विक्री करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमची ठरु शकते. केंद्रीय बँकांनी महागाईचा विषय योग्यरितीने हाताळल्यास शेअर बाजार सावरु शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

IMF ने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 4 लाख कोटीपर्यंत घसरण येण्याची शक्यता वर्तवली आहे. 2026 पर्यंत ही घसरण होण्याचा अंदाज आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांना मोठ्या संकटांचा सामना करण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?