AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत उसळी! किंमती इतक्या वधारल्या, आजचा भाव काय

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने जागतिक दबाव झुगारुन देत उसळी घेतली आहे. त्यामुळे गेल्या आवठड्यापासून सुरु असलेल्या पडझडीला ब्रेक बसला. गेल्या दहा दिवसांत किंमतीत 1100 रुपयांची घसरण झाली होती. काल भाव इतके वधारले..

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत उसळी! किंमती इतक्या वधारल्या, आजचा भाव काय
| Updated on: Jun 17, 2023 | 9:13 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Rate Today) जागतिक दबाव झुगारुन देत उसळी घेतली आहे. त्यामुळे गेल्या आवठड्यापासून सुरु असलेल्या पडझडीला ब्रेक बसला. गेल्या दहा दिवसांत किंमतीत 1100 रुपयांची घसरण झाली होती. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम सोने-चांदीवर दिसून आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कुठलीही वाढ केली नाही. त्याचा दबाव मौल्यवान धातूंवर दिसला. किंमतीत पुन्हा पडझड झाली. पण शुक्रवारी सोन्याने दबाव झुगारला. किंमती संध्याकाळच्या सत्रात एकदम उसळल्या. आज 17 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता इतकी आहे.

आठवड्याच्या पाचव्या दिवशी असा भाव या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याने उसळी घेतली. 22 कॅरेट सोने 400 रुपयांनी वधारुन 55,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 24 कॅरेट सोने 440 रुपयांनी महागले. हा भाव 60,260 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सकाळच्या सत्रातील भावाची अपडेट उपलब्ध झाली नाही. शनिवार-रविवार सोने-चांदीचे भाव अपडेट होत नाहीत. गुडरिटर्न्सनुसार हे दर आहेत.

यापूर्वी घसरण गुरुवारी सोने-चांदीत घसरण झाली. 330 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने सोने स्वस्त होऊन 58934 रुपयांवर आले. बुधवारी सोने 591 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 59264 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारी सोन्यासोबत चांदीत ही घसरण दिसून आली. गुरुवारी चांदी 1143 रुपयांनी स्वस्त झाली. एक किलो चांदीचा भाव 71062 रुपये प्रति किलोवर पोहचला. तर बुधवारी चांदी 1064 रुपयांनी महाग होऊन 73169 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी 24 कॅरेट सोने 59582 रुपये, 23 कॅरेट 59343 रुपये, 22 कॅरेट सोने 54577 रुपये, 18 कॅरेट 44687 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

मागणी घटली सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही बाजाराकडे ग्राहकांची पावले वळली नसल्याचा दावा आयबीजेएने केला आहे. भावात घसरण झाली असतानाही मागणीत त्या तुलनेत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. केवळ 5-10 टक्केच मागणी वाढल्याने सराफा बाजार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?