AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today | आज सोने चकाकले, जाणून घ्या सोन्या चांदीचे दर

Gold Silver Price Today News | आंतरराष्टीय बाजारात डॉलर कमकूवत झाल्याने आज सोने चकाकले आहेत तर चांदी लकाकली आहे. पाच आठवड्यापासून सोन्या आणि चांदीचे भाव घसरले होते. पण आज रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याने सोन्याचे भाव वधरले.

Gold Rate Today | आज सोने चकाकले, जाणून घ्या सोन्या चांदीचे दर
काय आहेत आजचे सोने चांदीचे दर?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 22, 2022 | 6:06 PM
Share

Gold Rate Today | गेल्या पाच आठवड्यांपासून सोन्याचे दर सातत्याने घसरत होते. पण आज देशातंर्गत घरगुती बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold and Silver Rate Today) तेजी दिसून आली. वायदे बाजारात (MCX) सकाळी 10 वाजता ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचे दर (Gold Rate Today) 252 रुपयांच्या उसळी सह 50,625 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यापार करत आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 287 रुपयांच्या उसळीसह 50,625 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर व्यापार करत आहे. स्पॉट गोल्ड यावेळी 5 डॉलरच्या उसळीसह 1715.55 डॉलर प्रति औस स्तरावर व्यापार करत होता. तर डॉलर इंडेक्समध्ये (Dollar Index) यावेळी घसरण दिसून आली. हा निर्देशांक 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 107.752 स्तरावर पोहचला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या चकाकी आणि चांदीची लकाकी परतली. MCX वर सप्टेंबर डिलव्हरीच्या चांदीची किंमत 303 रुपयांनी तेजीत आली आणि चांदी प्रति किलोग्रॅम 55,890 रुपये झाली. तर डिसेंबर डिलिव्हरीची चांदी 339 रुपयांच्या तेजीसह 56,858 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,400 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,480 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 1660 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 999 शुद्ध चांदीचा दर शुक्रवारी 54,767 रुपये प्रति किलोग्रॅम होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडवळीवरील शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. तसेच हे दरपत्रक सूचक आहे. स्थानिक पातळीवर या दरात बदल होण्याची शक्यता असते.

डॉलरपेक्षा रुपया मजबूत

आज रुपयामध्ये तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी मजबूत होऊन तो 79.79 स्तरावर पोहचला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 79.88 स्तरावर बंद झाला होता. आज शेअर बाजारातही त्याचा परिणाम दिसून आला. बाजार सुरुवातीलाच 400 अंकांच्या तेजीने उघडला.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार