AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उच्चांकानंतर सोने, चांदी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ आहे का?

दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. यूएस फेड आणि बहुतेक युरोपियन मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे.

उच्चांकानंतर सोने, चांदी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ आहे का?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 04, 2023 | 10:32 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. त्यानंतर सोन्याचे दर उच्चांकावर गेले. उच्चांकी झेप घेतल्यानंतरही सोने आता घसरले आहे. वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्यात घसरण झाली आहे. सोने सर्वकालीन 58,800 रुपयाच्या किंमतीवर पोहचले. त्यात आता 2,300   रुपयांची घसरण झाली आहे. ( Gold Price Today) गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव 3.23 टक्क्यांनी कमी झाले आहे.

का घसरताय भाव

सोन्याचा वाढता भाव लक्षात घेता, येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. यूएस फेड आणि बहुतेक युरोपियन मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच यूएस डॉलरचे दर 10 महिन्यांच्या नीचांकीवरून सुधारले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. हा भाव 1,930 डॉलर प्रति औसवर होता.

चांदीची चमक फिकी

चांदीने ग्राहकांची चांदी केली होती. गेल्या काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण होत होती. 3 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 73800 रुपये होता. 4 फेब्रवारी रोजी त्यात 2600 रुपयांची घसरण होत 71200.00 झाला असल्याचे गोल्ड रिर्टन वेबसाईटने दिले आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांदीचा दर 74700 रुपये झाला होता.

सोन्याची शुद्धता कोण ठरवतात

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढे कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. त्यानुसार भाव ठरतात.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?