AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price : चांदी चमकली, आज सोने किती झाले महाग?

Gold Silver Price : चांदीच्या किंमतींनी आज गुंतवणूकदारांची चांदी केली. सोन्याच्या किंमतींनीही मोठी उसळी घेतली.

Gold Silver Price : चांदी चमकली, आज सोने किती झाले महाग?
आजचा दर काय
| Updated on: Feb 02, 2023 | 4:30 PM
Share

नवी दिल्ली : गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) मोठी उसळी दिसली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion And Jewellers Association) दर जाहीर केले. त्यात चांदीने जोरदार मुसंडी मारली तर सोन्याच्या भाव पण वधारला आहे. भारतीय सराफा बाजारात आज, 02 फेब्रुवारी 2023 रोजी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव आज 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही पुढे गेला. तर चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलोवर पोहचला. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,689 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीचा भाव 71,250 रुपये प्रति किलो आहे. अर्थसंकल्पानंतर सोने-चांदीचे दर भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात सोने-चांदी गुंतवणूकदारांना मालामाल करतील. तर खरेदीदारांना आणखी रक्कमेची तजवीज करावी लागणार आहे.

बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,910 रुपये होता. तर आज गुरुवारी सकाळी हा भाव 58,689 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदीच्या किंमतीत तफावत आहे. शुद्ध सोने आणि चांदीसाठी जास्त खर्च करावा लागतो.

ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव वधारला. हा दर 58,454 रुपयांवर पोहचला. तर 916 शुद्ध सोने आज 53,759 रुपयांवर पोहचले. शुद्ध सोन्यात भाव वाढ दिसून आली तर चांदीची किंमत वधारली.

750 शुद्ध सोन्याचे दर 44,017 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 585 शुद्ध सोन्याच्या भावात वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 34,333 रुपयांवर पोहचली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 71,250 रुपये होती.

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल,  तेवढे सोने शुद्ध ठरते. त्यानुसार भावात बदल दिसतो.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?