Gold Price: सोन्याची चमक फिकी पडली, उच्चांकी स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त

| Updated on: Jun 15, 2021 | 10:57 AM

अमेरिकेच्या फेडरल बँकेची पतधोरण बैठक बुधवारी संपणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सतर्क आहेत. तर डॉलरचा सध्याचा भावही एका महिन्यातील उच्चाकांच्या जवळपास आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते. | Gold rates

Gold Price: सोन्याची चमक फिकी पडली, उच्चांकी स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
Follow us on

नवी दिल्ली: वायदा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीची चमक फिकी पडताना दिसली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे भारताच्या कमोडिटी मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर (Gold) 48,493 रुपयांपर्यंत खाली घसरला. काहीवेळानंतर हा भाव पुन्हा वर गेला. तर दुसरीकडे वायदा बाजारात (Future) चांदीच्या दरातही 0.72 टक्क्यांची हलकीशी घसरण पाहायला मिळाली. (Gold Silver prices today 15 june 2021)

सोन्याचे नवे दर

एमसीएक्स मार्केटमध्ये ऑगस्ट वायदा सोन्याचा भाव 35 रुपयांनी वधारून प्रतितोळा 48,558 इतका झाला. सोमवारी सोन्याची किंमतीत 0.8 टक्क्यांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचा भाव वाढल्याने ही घसरण झाली.

चांदीची नवी किंमत

चांदीच्या जुलै वायद्याची किंमत 514 रुपयांनी घसरुन प्रतिकिलो 71,365 रुप ये इतकी झाली.आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा प्रतिऔंस भाव 0.7 टक्क्यांनी घसरुन 27.64 डॉलर्स इतका झाला.

सोन्याचे दर का पडले?

अमेरिकेच्या फेडरल बँकेची पतधोरण बैठक बुधवारी संपणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सतर्क आहेत. तर डॉलरचा सध्याचा भावही एका महिन्यातील उच्चाकांच्या जवळपास आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते.

सोने खरेदीसाठी आजपासून हॉलमार्किंग अनिवार्य

येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल. (Gold Jewellery Hallmarking become compulsory from today onwards)

या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.

इतर बातम्या:

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

(Gold Silver prices today 15 june 2021)