ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. (GST Council Meeting)

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, 4 लाख विमा देणाऱ्या या सरकारी योजनेवर प्रीमियम वाढ नाही
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 5:21 PM

नवी दिल्ली: जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारी 5 टक्के जीएसटी कायम राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. 30 सप्टेंबर 2021पर्यंत जीएसटी कपातीचा निर्णया लागू राहणार असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. (No GST on black fungus drug, rates reduced on several Covid-related essentials)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज 44 वी जीएसटी कौन्सिल पार पडली. यावेळी कोरोना संबंधित मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधांवरील जीएसटीत कपात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या बैठकीत रेमडेसिवीरील जीएसटी दर 12 टक्क्यावरून कमी करून 5 टक्के करण्यात आला. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली आहेत. तसेच मेडिकल ग्रेड ऑक्सिजनसाठीचा जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

यातही कपात

आता बायपॅप मशीन, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटरला जीएसटीचेच दर लागू राहतील. त्याशिवाय कोविड टेस्टिंग किट, हँड सॅनिटाझर, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्सवरील जीएसटी कपात करून 5 टक्के करण्यात आली आहे.

अधिसूचना उद्या काढणार

रुग्णवाहिकेवरील जीएसटी दर कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे. सध्या रुग्णवाहिकेवर 28 टक्के जीएसटी आकारला जातो. कोरोनाशी संबंधित ज्या साहित्यांवर सूट देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना उद्या जारी करण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही कपात लागू राहील. त्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होणार आहे.

कोणतंही राजकारण नाही

कोरोना व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारा जीएसटी रद्द करण्याची सर्वच स्तरातून मागणी होत होती. मात्र, जीएसटी परिषदेने कोरोना व्हॅक्सिनवरील 5 टक्के जीएसटी दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात कोणतंही राजकारण नाही. व्हॅक्सिनवर 5 टक्के जीएसटी आहे. त्यातील 75 टक्के लसींची खरेदी केंद्र सरकार करत आहे. मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा सामान्य जनतेला फटका बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सीतारामन म्हणाल्या. (No GST on black fungus drug, rates reduced on several Covid-related essentials)

संबंधित बातम्या:

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकनंतर आता पंढरपुरात लस घेतल्यांतर अंगावर स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली?; जेडीयू, अपना दलची कॅबिनेटमध्ये समावेशाची शक्यता

(No GST on black fungus drug, rates reduced on several Covid-related essentials)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.