Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर

गुरुवारी देशभरात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 7 हजारांनी घट झाली आहे. | Coronavirus Updates

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर
कोरोना व्हायरस

नवी दिल्ली: गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असलेला देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे (Coronavirus) 84,332 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 70 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4002 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. (Coronavirus new patients in India)

गुरुवारी देशभरात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 7 हजारांनी घट झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,21,311 इतकी आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 84,332

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,21,311

देशात 24 तासात मृत्यू – 4,002

एकूण रूग्ण – 2,93,59,155

एकूण डिस्चार्ज – 2,79,11,384

एकूण मृत्यू – 3,67,081

एकूण सक्रिय रुग्ण – 10,80,690

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 24,96,00,304


राज्यात गेल्या 24 तासांत 11766 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 11766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 8104 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच राज्यातील जिल्हानिहाय कोरोना पॉझिटिव्हिटी रेट काल जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 15.85 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर रत्नागिरी 14.12 टक्के, रायगड 13.33 टक्के, सिंधुदुर्ग 11.89 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे.

संबंधित बातम्या:

Mumbai Unlock Update : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट साडे पाच टक्क्याच्या खाली, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच! कारण काय?

पॉझिटिव्हीटी दर, ऑक्सिजन बेडस उपलब्धतेनुसार, स्थानिक प्रशासन निर्बंधाबाबत निर्णय घेणार, 14 जूनपासून अमंलबजावणी

तुम्ही मुंबईवरुन पुण्याला ई-पासशिवाय जाऊ शकताय? पाहा महाराष्ट्राचा लेव्हलवाईज अनलॉक प्लॅन…

(Coronavirus new patients in India)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI