तुम्ही मुंबईवरुन पुण्याला ई-पासशिवाय जाऊ शकताय? पाहा महाराष्ट्राचा लेव्हलवाईज अनलॉक प्लॅन…

पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर (लेव्हल्स) ठरवतील असं मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (Maharashtra levelWise unlock plan)

तुम्ही मुंबईवरुन पुण्याला ई-पासशिवाय जाऊ शकताय? पाहा महाराष्ट्राचा लेव्हलवाईज अनलॉक प्लॅन...
मुंबई-पुणे... महाराष्ट्राचा अनलॉक प्लॅन कसा आहे?
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 8:57 AM

मुंबई : पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर (लेव्हल्स) ठरवतील असं मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार आता कोणता जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये किंवा स्तारामध्ये, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. तसंच प्रवासासाठी आता कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असणार आहे, असेही प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत, महाराष्ट्राच्या लेव्हलवाईज अनलॉक प्लॅनमधून…! (Can you go from Mumbai to Pune without e-pass? Maharashtra levelWise unlock plan)

ई पासची आवश्यकता कुणाला?

राज्यभरातल्या प्रवासावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. पण जे जिल्हे लेव्हल 4 आणि 5 अंतर्गत येतात त्यांच्यासाठी ई पासची आवश्यकता असणार आहे. सध्या कोणताही जिल्हा 5 लेव्हलमध्ये नाहीय तर चौथ्या लेव्हलमध्ये कोणते जिल्हे येतील, हे देखील शासनाने आणखी स्पष्ट केलेलं नाहीय. पण प्रवास करताना मास्क, सुरक्षित अंतर इ. गोष्टी अनिवार्य असणार आहे.

मुंबईची स्थिती काय आहे…?

चालू आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. असं असलं तरी मुंबई लेव्हल 3 मध्येच असेल आणि त्यानुसारच मुंबईत नियमावली लागू असेल, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. पॉझिटिव्हिटी रेट स्थित असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. असं असताना मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट घसरल्यानंतरही मुंबईत सध्या तरी लेव्हल 3 चेच निकष लागू असणार आहेत.

पुण्याची स्थिती काय आहे?

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल, असंही त्यांनी म्हटलं.

?पाच लेव्हल कशा आहेत??

?पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत…

?दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत…

?तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील…

?चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर…

?पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील..

(शासन आदेश काढताना शिथिलता आणि निर्बंधांमध्ये बदल होऊ शकतो…)

(Can you go from Mumbai to Pune without e-pass? Maharashtra levelWise unlock plan)

हे ही वाचा :

Mumbai Unlock Update : मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट साडे पाच टक्क्याच्या खाली, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच! कारण काय?

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.