AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असूनही खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची आशा या क्षणी नगण्य आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता
मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच
| Edited By: | Updated on: Mar 29, 2021 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, यावेळी देशात मोहरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. असे असूनही, खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची काही आशा नाही. येत्या काळात खाद्यतेलाच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात तेलाच्या किंमतीही बर्‍याच दिवसांपासून वाढत आहेत. त्याचा परिणाम खाद्य तेलावरही होतो. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये या महिन्यात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये आधीच 50 टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

मलेशियामध्ये पाम तेलाची किंमत विक्रमी स्तरावर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार मलेशियाच्या बाजारपेठेत पाम तेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 2008 नंतर प्रथमच एक टन पाम तेलाची किंमत 969 अमेरिकन डॉलर्सच्या जवळ पोहोचली आहे. मलेशिया पाम तेलाचा एक मोठा उत्पादक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताकडून 70 टक्के खाद्यतेलाची आयात

मलेशियामध्ये पाम तेलाची किंमत प्रति टन एक हजार डॉलरच्या जवळपास आहे, परंतु इतर बाजारात ते प्रति टन 1040 वरून 1100 डॉलरवर गेले आहे. तर सोयाबीन तेलाची किंमत 1190 वरुन 1270 डॉलर प्रति टन झाली आहे. दोन्ही प्रमुख तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम लवकरच भारतावरही दिसून येईल. याचे प्रमुख कारण म्हणजे भारत आपले 70 टक्के खाद्यतेल अन्य देशांकडून आयात करतो.

मोहरीच्या उत्पादनाची विक्रमी नोंद

भारतात यावेळी मोहरीचे पीक खूप चांगले आले आहे. अशा परिस्थितीत सरकार विक्रमी उत्पादनाचा अंदाज लावते. तथापि, विक्रमी उत्पादनाचा दरावर परिणाम होत नाही आणि मोहरीची विक्रमी किंमतीवर विक्री होत आहे. राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नैम) अर्थात ऑनलाईन मार्केटच्या मते 25 मार्च रोजी राजस्थानच्या चाकसू मंडईमध्ये मोहरीचा भाव प्रतिक्विंटल 6,781 रुपये होता. दुसरीकडे, भरतपूर मंडईमध्ये याचा सरासरी दर 5500 रुपये क्विंटल सुरू आहे. शेतकरी सरकारला विक्री करण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांना मोहरी विकत आहेत कारण त्यांना चांगला भाव मिळत आहे.

सध्या दिलासा मिळण्याची आशा नाही

सोयाबीनच्या किंमती वाढल्यामुळे रिफाइंड करणाऱ्या मिलही मोहरी खरेदी करत आहेत. जर त्यांनी अधिक दराने खरेदी केले तर उत्पादनाची किंमत जोडून त्यांना बाजारात खाद्यतेल महागच मिळेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम त्यांच्या किमतींवरही होईल. अशा परिस्थितीत तज्ज्ञ असे म्हणत आहेत की मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असूनही खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची आशा या क्षणी नगण्य आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

इतर बातम्या

Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.