Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?

इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) एक महाकाय जहाज अडकल्याने युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झालाय.

Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?


कैरो : इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) एक महाकाय जहाज अडकल्याने युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झालाय. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागलीय. यामुळे दररोज 7500 कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान होतंय. याचा थेट परिणाम भारतावरही होण्यास सुरुवात झालीय. त्यामुळेच भारतानेही यावर 4 सुत्री उपाययोजना केली आहे (Indian trade also affected by Suez Canal Blockage).

व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यांत म्हटलं, “सुएझ कालव्यातील अडथळ्यांमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे.” या बैठकीचं नेतृत्व विशेष सचिव (लॉजिस्टिक) पवन अग्रवाल यांनी केलं. त्यांच्यासोबत बैठकीत पोर्ट , शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, ADG शिपिंग, कंटेनर शिपिंग लायसन्स असोसिएशन (CSLA) आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनही (FIEO) सहभागी होती.

सुएझ कालव्यात किती जहाजं रांगेत?

सुएझ कालव्याची वाहतूक ठप्प झाल्याने आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण भागात एकूण 200 पेक्षा अधिक जहाजं रांगेत उभी आहेत. यात दररोज 60 जहाजांची भर पडत आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस हा कालवा बंद राहिला तर रांगेत उभ्या असलेल्या जहाजांची संख्या 350 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी संपायला आणखी एक आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

भारताकडून कोणत्या उपाययोजना?

कार्गोच्या प्राधान्यानुसार FIEO, MPEDA आणि APEDA संयुक्तपणे खराब होणाऱ्या कार्गोंची ओळख पटवतील आणि त्यांच्यासाठी शिपिंग लाईनसोबत काम करतील. या संकटाच्या काळात किमतीत वाढ न करता दर स्थिर ठेवावेत असं आवाहन शिपिंग लाईनला करण्यात आलंय. बंदरं आणि जलमार्ग मंत्रालयाने या बंदरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अडकलेल्या जहाजावर मोठ्या प्रमाणात भारतीय कर्मचारी

सुएझ कालव्यातील अडकलेलं महाकाय जहाज काढण्याचं काम सुरुच आहे. विशेष म्हणजे या जहाजावर बहुतांश कर्मचारी हे भारतीय आहेत. तसेच शिपची कॅप्टन इजिप्तची आहे.

सुएझ कालव्याचं वैशिष्ट्यं काय?

सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम 1869 मध्ये झाले. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.

सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगाने करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरु होण्याआधी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास 7000 किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे 7000 किमी अंतर कमी होऊन 193.3 किमी झालं.

हेही वाचा :

भारताचा चीनला आणखी एक झटका, चीनकडून आयातीपेक्षा निर्यातीची टक्केवारी वाढली

चीनच्या वस्तूंवर बंदी घालणं भारताला खरंच शक्य आणि परवडणारं आहे का?

व्हिडीओ पाहा :

Indian trade also affected by Suez Canal Blockage

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI