Today Gold Price : सोने होणार स्वस्त! आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती झरझर घसरल्या, गाठला एक महिन्यातील नीच्चांक

Today Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने गेल्या महिन्याभराच्या नीच्चांकीस्तरावर पोहचले आहे. सोन्याच्या किंमतीवर अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातंर्गत सराफा बाजारात सोने-चांदींच्या किंमती स्वस्त होतील का?

Today Gold Price : सोने होणार स्वस्त! आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती झरझर घसरल्या, गाठला एक महिन्यातील नीच्चांक
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली : अमेरिकन फेडरल बँकेच्या कडक भूमिकेमुळे येत्या काही दिवसांत डॉलर (Dollar Index) मजबूतीकडे झुकेल. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती सातत्याने घसरत असून गेल्या काही दिवसांत किंमती स्थिर आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या गुंतवणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने गेल्या महिन्याभराच्या नीच्चांकीस्तरावर पोहचले आहे. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve Bank) येत्या काही दिवसांत व्याजदरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा भारतीय बाजारावर काय परिणाम होतो, ते लवकरच दिसून येईल. देशातंर्गत सराफा बाजारात सोने-चांदींच्या किंमती (Gold Silver Price) स्वस्त होतील का? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

या 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम नोंदविला होता. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याने 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1953 GMT नुसार 1% घसरले. काल हा भाव $1,845.30 प्रति औंस वर होता. US सोने फ्युचर्स $1,865.80 इतके आहे. अमेरिकेत किरकोळ विक्रीत जानेवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत 3% वाढ झाली.कर्जावरील व्याजदर वाढूनही आर्थिक लवचिकता दिसून येत आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

हे सुद्धा वाचा

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

  1. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या भावात कुठलाही बदल झाला नाही
  2. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,550 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे
  3. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
  4. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,160 रुपये आहे
  5. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,160 रुपये आहे
  6. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,160 रुपये आहे
  7. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,430 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,210 रुपये आहे

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.