Gold, silver prices : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदीही दीड हजारांनी महागली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

सोन्याच्या (Gold) दरात शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चांदीचे भाव देखील वधारले आहेत. सलग तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 200 रुपये इतकी झाली आहे.

Gold, silver prices : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदीही दीड हजारांनी महागली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आजचे सोन्याचे दर
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 26, 2022 | 10:52 AM

मुंबई : सोन्याच्या (Gold) दरात शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चांदीचे भाव देखील वधारले आहेत. सलग तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 200 रुपये इतकी झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत प्रति तोळा 47950 इतकी होती. आज त्यामध्ये वाढ होऊन सोने 48 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच त्यामध्ये आज दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. तर आज चांदीचा भाव देखील वाढला असून, चांदीचा दर 70 हजार रुपये प्रति किलो आहे. शुक्रवारी चांदीचा (silver) दर 68500 रुपये इतका होता. आज चादींचे दर देखील दीड हजार रुपयांनी वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर दीडशे रुपयांनी वाढले आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48200 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,590 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48300 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52, 690 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48250 आणि 52640 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 70 हजार रुपये इतका आहे. कालच्या तुलनेमध्ये आज सोने दीडशे रुपयांनी तर चांदी दीड हजार रुपयांनी वधारली आहे.

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहोत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

इंधनाच्या किमतींमध्ये आज पुन्हा वाढ; पाच दिवसांमध्ये पेट्रोल 3.20 रुपयांनी महाग, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

India-China trade : चीनमधून आयात घटली, निर्यातीत 26 टक्क्यांची वाढ

अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा