AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Hike | धनत्रयोदशीला सोन्याने दिला इतका परतावा, गुंतवणूकदार मालामाल

Gold Hike | परतावा देण्यात सोने अव्वल ठरले आहे. सोन्याने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या धनत्रयोदशीपेक्षा आतापर्यंत खरेदीदारांना चांगला रिटर्न मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या भावाशी तुलना करता 10 ग्रॅममागे खरेदीदारांना चांगली कमाई करता आली. ऑनलाईन सोन्यातील गुंतवणूक पण फायदेशीर ठरली आहे.

Gold Hike | धनत्रयोदशीला सोन्याने दिला इतका परतावा, गुंतवणूकदार मालामाल
| Updated on: Nov 07, 2023 | 11:15 AM
Share

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : या धनत्रयोदशीला सोन्यातील गुंतवणूक, अनेकांसाठी शुभ ठरु शकते. कारण ज्यांनी गेल्यावर्षी गुंतवणूक केली, त्यांना सोन्यावाणी परतावा मिळाला आहे. त्यांना एकाच वर्षात जोरदार परतावा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील तेजी कायम राहू शकते. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना घेता येईल. गेल्या वर्षी धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या किंमतीत जवळपास 22 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याची किंमत 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर सध्या सोन्याचा भाव 61,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्यातील हा बदल ग्राहकांच्या चटकन लक्षात येईल. गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत जवळपास 9 टक्क्यांची वाढ झाली आहे.

वायदे बाजारात काय बदल

इस्त्राईल-हमास युद्धाच्या अगोदर वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या बेंचमार्क फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी हा भाव 56,075 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर त्यामध्ये जोरदार वाढ झाली. 31 ऑक्टोबर रोजी 61,539 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत या किंमती वधारल्या. सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी 0.28 टक्के घसरणीसह 60,849 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंद होता. तर यावर्षी 6 मे रोजी MCX वर सोन्याची किंमत 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकी स्तरावर पोहचला होती.

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

तज्ज्ञांच्या मते, सोने अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे. इस्त्राईल आणि हमास युद्धामुळे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येत आहे. जागतिक पातळीवर पण या धातूत तेजीचे सत्र आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच नाही तर जगभरातील अनेक केंद्रीय, मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढवत आहे. सोन्याची खरेदी करत आहे. काही दिवसात इस्त्राईल-हमास युद्धावर पडदा पडला तरी, अनेक देशात मंदीची लाट आहे. त्यामुळे संस्थागत गुंतवणूकदार सोन्याला महत्व देण्याची शक्यता आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत अजूनही नरम आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.

कुठे, कशी गुंतवणूक?

सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) आणि गोल्ड ईटीएफ  या दोन्हीमध्ये कमीतकमी 1 ग्रॅम सोन्याच्या समतूल्य एक युनिटची खरेदी करता येईल. तर गोल्ड म्युच्युअल फंडात कमीत कमी 1,000 रुपये से एसआयपी (SIP) सुरु करता येईल. गोल्ड म्युच्युअल फंडात (Gold ETF) ही गुंतवणूक करता येईल. Gold ETF आणि गोल्ड फंड मध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तर सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोन्याच्या किंमती इतके युनिट खरेदी करु शकते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.