AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : चला की खरेदीला! झरझर उतरले सोन्याचे भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या पण आठवड्यात आनंदवार्ता आणली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत नरमाई आली होती. सोमवारी सोने-चांदीने ग्राहकांना सुखद धक्का दिला. बाजारात ग्राहकांना आता या दोन्ही धातूंमध्ये अजून घसरण हवी आहे. धनत्रयोदशीपूर्वीच भाव अजून उतरले तर सराफा बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today : चला की खरेदीला! झरझर उतरले सोन्याचे भाव
| Updated on: Nov 07, 2023 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : गेल्या सोमवारी सराफा बाजारात आनंद लहरी होत्या. ग्राहकांना अनेक दिवसानंतर दिलासा मिळाला होता. दिवाळी आता तोंडावर आली आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत आपटी बार आला होता. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना झाला होता. त्यामुळे 24 कॅरेट सोने स्वस्त होण्याची आस लागली होती. जागतिक घडामोडींमुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. सध्या सोने-चांदीने कोणताही नवीन रेकॉर्ड केला नाही. भावात चढउतार होत आहे. सोने जर 60,000 रुपयांच्या खाली उतरले तर सरफा बाजारात गजबज वाढेल. सोमवारी सोने-चांदीत (Gold Silver Price Today 7 November 2023) इतकी घसरण झाली.

सोन्यात 1400 रुपयांची घसरण

गेल्या दहा दिवसांत सोन्यात घसरण दिसून आली. या दहा दिवसांमध्ये सोने जवळपास 1400 रुपयांनी उतरले तर या काळात त्यामध्ये 220 रुपयांची वाढ झाली. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. 3 नोव्हेंबर रोजी त्यात 100 रुपयांची वाढ झाली. 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. आता 22 कॅरेट सोने 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी महागली

चांदीत सातत्याने घसरण सुरु होती. त्याला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,053 रुपये, 23 कॅरेट 60,808 रुपये, 22 कॅरेट सोने 55,925 रुपये झाले. 18 कॅरेट 45,790 रुपये, 14 कॅरेट सोने 35,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 72,037 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!