AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोन्याची आगेकूच, चांदी घसरली, जाणून घ्या 24, 23, 22 कॅरेटचा भाव

Gold Silver Price Today : सोने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरचढ ठरत आहे. जागतिक घडामोडींचा हा परिणाम आहे. डॉलरचा दबाव आणि मंदीच्या वार्ता यामुळे सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे.

Gold Silver Price Today : सोन्याची आगेकूच, चांदी घसरली, जाणून घ्या 24, 23, 22 कॅरेटचा भाव
सोने वधारले, चांदी घसरली
| Updated on: May 12, 2023 | 9:58 AM
Share

नवी दिल्ली : सोने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरचढ ठरत आहे. जागतिक घडामोडींचा हा परिणाम आहे. डॉलरचा दबाव आणि मंदीच्या वार्ता यामुळे सोने-चांदीच्या भावात (Gold Silver Price) सातत्याने चढउतार होत आहे. 3 मे रोजी सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याने 800 रुपयांची भरारी घेतली होती. त्यानंतर सोन्याचा भाव सातत्याने वाढत गेला. 6 मे रोजी सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची घसरण झाली. 8 मे पासून भावात पुन्हा वाढ झाली. 11 मे रोजी ibjarates.com नुसार, संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,585 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गुडरिटर्न्सवर गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे भाव जाहीर झालेले नाहीत.

24, 23, 22 कॅरेटचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,585 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 61,339 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 56,411 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. 18 कॅरेट सोन्याचा भाव 46,188 रुपये आहे.

चांदीत  घसरण 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर आज 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. 11 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.

मागणीत घसरण सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.