AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीदारांची मांदियाळी सुवर्णपुरी, चांदीने धरली वाट महागाईची

Gold Silver Rate Today : आज भक्तीमय वातावरण आहे. आज सोने-चांदी खरेदीसाठी चांगला योग आहे. सोने सध्या घसरणीवर आहे. चांदीने मात्र दोन दिवसांत उसळी घेतली आहे. आज सराफा बाजारात खरेदीदारांना स्वस्त सोने आणि चांदी महाग मिळेल. जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold Silver Rate Today : खरेदीदारांची मांदियाळी सुवर्णपुरी, चांदीने धरली वाट महागाईची
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jun 29, 2023 | 9:32 AM
Share

नवी दिल्ली : सराफा बाजारात सोन्याचे दर पुन्हा घसरले. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्यात आपटी बार सुरु आहे. चांदी मात्र दोन दिवसात महागली. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोन्याने नवीन रेकॉर्ड केले होते. सोने उच्चांकावर होते. त्यामुळे जून महिन्यात सोने 70 हजारांचा टप्पा ओलांडेल असा दावा करण्यात येत होता. पण मे महिन्यात सोन्याने रिव्हर्स गिअर टाकला. ही घसरण जून महिन्यात पण कायम राहिली. 62,000 रुपयांचा टप्पा गाठणाऱ्या सोने आता 59,000 रुपयांच्या जवळपास खेळत आहे. चांदीत ही घसरण होती. पण चांदीने पुन्हा उसळी घेतली. जाणून घ्या सोने-चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) किती तफावत आली ते..

सोन्यात अशी झाली पडझड 28 जून रोजी सोने 320 रुपयांनी घसरले. 24 कॅरेट सोने 59,110 रुपयांपर्यंत घसरले. 27 जून रोजी सोन्याची किंमत 59,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. 24 आणि 26 जून रोजी किंमती अनुक्रमे 160 आणि 100 रुपयांनी महागल्या. 23 जून रोजी 430 रुपयांनी किंमती उतरल्या. भाव 59,170 रुपये झाला. 21, 22 जून रोजी किंमती अनुक्रमे 330, 220 रुपयांनी घसरल्या. किंमत 59600 रुपयांपर्यंत खाली आली. 20 जून रोजी 24 कॅरेट सोन्यात 60 रुपये घसरण झाली. भाव 60,150 रुपयांवर पोहचलाय. गुडरिटर्न्सनुसार या किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 28 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,151 रुपये, 23 कॅरेट 57,918 रुपये, 22 कॅरेट सोने 53,266 रुपये, 18 कॅरेट 43,613 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34018 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

चांदी हजाराने वधारली गेल्या काही दिवसांपासून चांदीत घसरण सुरु होती. चांदीत जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली. किंमती 70,900 रुपयांपर्यंत खाली आल्या. पण गेल्या दोन दिवसांपासून चांदीत जवळपास हजार रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीची किंमत 71,900 रुपयावर आली. गुडरिटर्न्सनुसार ही किंमत आहे.

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?