Gold and Silver Price : सोनं 65000 रुपयाने स्वस्त… खरेदी करायचं की नाही? एक्सपर्टने दिला सल्ला

गेल्या 11 महिन्यांत सोनं 65,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीही मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ग्राहक 'सोनं खरेदी करायचं की नाही?' या विचारात आहेत. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, 2028 पर्यंत सोन्याचा भाव 1.69 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतो, कारण फेड व्याज कपात आणि केंद्रीय बँकांची खरेदी अपेक्षित आहे. मात्र, यात जोखीमही आहे, ज्याचा विचार करून गुंतवणूक करावी.

Gold and Silver Price : सोनं 65000 रुपयाने स्वस्त... खरेदी करायचं की नाही? एक्सपर्टने दिला सल्ला
gold price today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 5:07 PM

गेल्या 11 महिन्यात सोनं 65 हजार रुपयाने स्वस्त झालं आहे. सध्या 10 ग्रॅम सोनं 1.28 लाख रुपये झालं आहे. तर चांदी 2.60 लाख रुपये प्रति किलोने घसरून 1.60 लाख रुपये प्रति किलोवर आली आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार सोन्या चांदीचे हे भाव आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या चांदीच्या दरात वेगाने घसरण होत असल्याने सोनं खरेदी करायचं की नाही? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. त्यावर गोल्डमॅन सॅक्सने काही विश्लेषण मांडलं असून त्यानुसार ग्राहकांनी आपल्या रिस्कवर निर्णय घ्यायचा आहे.

सोन्या चांदीच्या दरात वेगाने घसरण होत असल्याने गोल्डमन सॅक्सचा अंदाज आला आहे. या अंदाजानुसार, 2027 च्या अखेरीपर्यंत सोन्याचा भाव 4,650 डॉलर प्रति औंस म्हणजे सुमारे 1.40 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेलं आहे. 2028च्या अखेरीपर्यंत सोनं 5,600 डॉलर (1.69 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम) च्या स्तरावर जाऊ शकते. फेडच्या व्याज दरातील संभाव्य कपात, केंद्रीय बँकांची खरेदीदारी आणि पाश्चात्त्य देशातील गुंतवणुकदारांचं पुनरागमन यामुळे सोन्या चांदीच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.

Loading...

सोन्याची मागणी वाढणार

सोन्याच्या किमतीत तेजी येण्याची आशा असणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी गोल्डमन सॅक्सचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेच्या मते, सोनं 2028च्या अखेरपर्यंत 5600 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी सोन्याच्या दरात चढ उतार राहू शकतात. गोल्डमन सॅक्सच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरात वाढ झाल्यास भविष्यात सोन्याची मागणी वाढणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोने खरेदी करण्यात येणार असल्याने सोन्याच्या किमतीला आधार मिळणार आहे. त्यानंतर फेड व्याज दरातील कपात आणि पाश्चात्त्य गुंतवणूकदारांचे पुनरागमन यामुळे सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसणार आहे.

सोन्याची किंमत काय होणार?

5600 डॉलरच्या मोठ्या लक्ष्यासाठी गोल्डमन सॅक्सने 2027 च्या अखेरीपर्यंत सोन्याचा भाव 4,650 डॉलर प्रति औंस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात केंद्रीय बँकांचा सर्वात मोठा आधार मिळणार आहे. रिपोर्टमधील अंदाजानुसार, 2026 ते 2028च्या दरम्यान केंद्रीय बँक प्रत्येक महिन्याला सरासरी 60 टन सोनं खरेदी करू शकते. या तुलनेत 2022 मध्ये केंद्रीय बँक सरासरी मासिक खरेदी 17 टन होती. गोल्डमॅन सॅक्सच्या मते, केंद्रीय बँकांची ही खरेदी रिझर्व्ह मॅनेजमेंटमध्ये आलेल्या मोठ्या बदलाचे संकेत आहेत. अनेक देश आपल्या विदेशी मुद्रा भांडारात विविधता आणण्यासाठी डॉलरवर निर्भर राहून काम करत आहेत. त्यामुळे सोन्याचं भांडार वाढत आहे.

रिस्क काय?

गोल्डमॅन सॅक्सने सोनं खरेदी करण्याच्या काही रिस्कही सांगितल्या आहेत. जर अमेरिकन फेड अंदाजापेक्षा अधिक वेळा व्याज दर वाढवत असेल आणि महागडे दर दीर्घकाळापर्यंत राहणार असतील, तर सोन्यातील तेजी सिमीत होऊ शकते. बँकेच्या एका आकलनानुसार, जर फेड चार वेळा अतिरिक्त व्याज दर वाढवत असेल तर 2027 च्या शेवटपर्यंत सोन्याचा भाव 4,585 डॉलर प्रति औंस राहू शकतो. तसेच, जर गोल्ड ETF पासून सुमारे 300 टन सोने काढलं जाणार असेल तर 2027 च्या अखेरपर्यंतचा अंदाज घटून 4,265 डॉलर प्रति औंसपर्यंत येऊ शकतं. अशा प्रकारे गोल्डमॅन सॅक्सच्या 5,600 डॉलरच्या अंदाजाची काहीच हमी नाहीये. सोन्याची पुढील वाटचाल, केंद्रीय बँकांची खरेदी, अमेरिकन फेडचे व्याज दर आणइ पाश्चात्य देशाच्या गुंतवणूकदारांचं पुनरागमन यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us