Gold Price Fall : पहिल्यांदा केला रेकॉर्ड…मग अचानक घसरण, सोने झाले इतके स्वस्त, किंमती एक लाखांच्या खाली
Gold Price Down : इराण-इस्त्रायल, इस्त्रायल-हमास, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अस्थिरता वाढली आहे. भूराजकीय वादामुळे चांदीसह सोन्याने उंच भरारी घेतली. पण अचानक सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. ग्राहकांना खरेदीची संधी आहे.

गेल्या काही दिवसात सोन्याचा तोरा वाढला. जगात वाढत्या भूराजकीय तणावामुळे सोन्याने उच्चांक गाठला. आता इस्त्रायल-इराक आणि युक्रेन-रशिया युद्धाने सोनेच नाही तर चांदी सुद्धा तळपली आहे. दोन्ही धातु रोज नवनवीन विक्रम करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी, सोमवारी सोन्याचा भाव वायदे बाजारात (MCX) नवीन विक्रमी स्तर गाठला. 10 ग्रॅम सोने 1,01,078 रुपयांवर पोहचले. पण आता किंमतीत अचानक घट झाली. सोने 1400 रुपयांनी स्वस्त झाले.
वायदे बाजारात अचानक स्वस्त झाले सोने
सोन्याच्या किंमती सोमवारी वायदे बाजारात उसळी दिसून आली. 5 ऑगस्टच्या सौद्यासाठी सोन्याची वायदे बाजारात किंमत 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली. हा सर्वकालीन उच्चांक आहे. यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू झाली. त्यात मोठी घसरण दिसून आली. MCX वर सोन्याच्या भावात 1.42 टक्के, 1426 रुपयांची घसरण दिसली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,850 रुपयांपर्यंत घसरली.
स्थानिक बाजारात काय किंमती?
स्थानिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी उसळी दिसून आली नाही. इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 99,370 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 96,990 रुपये, 20 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 88,440 रुपये, 18 कॅरेट 10 ग्रॅम सोने 80,490 रुपये, 14 कॅरेट 10 ग्रॅम सोने 64,100 रुपये असा भाव आहे. सोने-चांदीचे देशभरातील भावात मेकिंग चार्ज आणि 3 टक्के जीएसटी वेगळा द्यावा लागतो.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
