AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला

Gold price | गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकही मोठ्याप्रमाणावर घटल्याचे निदर्शनास आले. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 57 टक्क्यांनी घसरुन 288 कोटी रुपये इतकी झाली आहे.

Gold Price: दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 11:58 AM
Share

मुंबई: गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर सोमवारी सोन्याची किंमत पुन्हा एकदा वाढली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. तर या महिन्याच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. (Gold Price Fallen in MCX)

तसेच गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकही मोठ्याप्रमाणावर घटल्याचे निदर्शनास आले. गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 57 टक्क्यांनी घसरुन 288 कोटी रुपये इतकी झाली आहे.

देशभरात 16 जुनपासून हॉलमार्किंग अनिवार्य

देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.

केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफ व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.

संबंधित बातम्या:

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिन्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल

(Gold Price Fallen in MCX)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.