AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोने 1000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा अन्यथा संधी गेलीच समजा

स्पॉट सोन्याचे भाव औंस 0.2% खाली घसरून 1,803.33 डॉलर प्रति औंस होते. या आठवड्यात आतापर्यंत शेवटच्या पाच दिवसांत मौल्यवान धातू 0.4% खाली आहे.

Gold Price Today: सोने 1000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा अन्यथा संधी गेलीच समजा
gold
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 10:57 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय बाजारात सोन्याच्या किमती घसरण्याचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव सुमारे 0.25 टक्क्यांनी घसरून 47,510 रुपये, तर चांदीचे वायदा भाव 0.22% वाढून 67,520 रुपये प्रति किलो झाले. कमकुवत जागतिक बाजारातील पाच सत्रांत सोन्याच्या किमती जवळपास 1000 रुपयांनी खाली आल्यात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एमसीएक्सवरील सोन्याची किंमत 46,850 ते 48,400 हजारांदरम्यान असेल. जागतिक बाजारपेठेत आज अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमती खाली आल्यात. स्पॉट सोन्याचे भाव औंस 0.2% खाली घसरून 1,803.33 डॉलर प्रति औंस होते. या आठवड्यात आतापर्यंत शेवटच्या पाच दिवसांत मौल्यवान धातू 0.4% खाली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या?

विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, नजीकच्या काळात सोन्याची मागणी मर्यादित राहील, कारण किमतींमध्ये वाढ ही मुख्य बाब आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या फेडच्या पॉलिसी बैठकीवर सोन्याचे व्यापारी लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, जुलैनंतर सोने महाग होईल, म्हणून गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला प्रचंड परतावा मिळेल, परंतु नंतर खरेदी केल्यास तुम्हाला महाग पडू शकते.

सोने 48,500 रुपयांवर जाणार

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मौल्यवान धातूच्या किमतीतील घसरण तात्पुरती आहे आणि सोन्याच्या गुंतवणूकदारांनी या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहिले पाहिजे. सराफा तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत लवकरच उलट होईल आणि ट्रेंड उलटल्यानंतर एका महिन्यात प्रति 10 ग्रॅम 48,500 पर्यंत पोहोचेल.

सोन्याने 28 टक्के परतावा दिला

जर आपण सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलत असल्यास गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला. गेल्या वर्षीही सोन्याचा परतावा सुमारे 25 टक्के होता. जर आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सोने अद्याप गुंतवणुकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.

संबंधित बातम्या

50,000 हजारांत सुरू करा व्यवसाय, 5 लाखांचा मोठा फायदा, कसा ते जाणून घ्या?

6.5 कोटी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; जुलैच्या ‘या’ तारखेला PF खात्यात येणार मोठी रक्कम, येथे चेक करा बॅलन्स

Gold Price Today: Check gold cheaply at Rs.1000, otherwise the opportunity is gone

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.