Gold Price Today: सोने वाढीसह 47 हजारांच्या घरात, चांदी 1200 रुपयांहून महाग, पटापट तपासा

| Updated on: Jul 29, 2021 | 5:45 PM

गेल्या सराफा व्यापारात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,610 रुपयांवर बंद झाला होता.

Gold Price Today: सोने वाढीसह 47 हजारांच्या घरात, चांदी 1200 रुपयांहून महाग, पटापट तपासा
Gold Price
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 29 जुलै 2021 ला सोन्याच्या किमतीत बर्‍याच दिवसांच्या घसरणीनंतर चांगली वाढ झाली. यामुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला. त्याचबरोबर चांदीच्या दरात आज 1200 रुपयांपेक्षा जास्त वाढ नोंदविण्यात आली. यासह चांदी 66 हजार रुपये प्रतिकिलोवर गेली. गेल्या सराफा व्यापारात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,610 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदी 64,994 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीच्या किमती वाढल्यात.

सोन्याची नवी किंमत

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावात 10 ग्रॅम प्रति 382 रुपयांची वाढ झाली. यामुळे मौल्यवान पिवळे धातू प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. राजधानी दिल्लीत आज शुद्ध 99.9 ग्रॅम सोन्याची किंमत 46,992 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,817 डॉलर झाली.

चांदीची नवी किंमत

चांदीच्या किमतीत आज जोरदार वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर गुरुवारी 1,280 रुपयांनी वाढून 66,274 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावातही वाढ झाली आणि ते प्रति औंस 25.42 डॉलरवर पोहोचले.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजच्या किमती वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमती वाढल्यात. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने दरात वाढ केल्याने डॉलरवर दबाव आणला. यामुळे गुंतवणूकदारांनी सर्वात सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आणि किमतीत वाढ नोंदवली गेली.

संबंधित बातम्या

दिग्गज आयटी कंपनी 1 लाख लोकांना नोकर्‍या देणार, उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ

आता मोदी सरकार तुमच्या घराचाही विमा उतरवणार, नुकसानीची भरपाई देणार

Gold Price Today: In a house of 47,000 with gold rising, check for silver more than Rs 1,200