Gold Price Today : लाडक्या बहिणी नाराज! सोने चकाकले, पुन्हा मोठी उसळी, जळगाव सराफा बाजारात काय किंमती

Jalgaon Sarafa Market : देशभरात सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. तर चांदीने पण पाठोपाठ झेप घेतली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमती वाढल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. रक्षा बंधनापूर्वी किंमती वधारत असल्याने लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत.

Gold Price Today : लाडक्या बहिणी नाराज! सोने चकाकले, पुन्हा मोठी उसळी, जळगाव सराफा बाजारात काय किंमती
सोने आणि चांदीची भरारी
| Updated on: Aug 05, 2025 | 12:40 PM

सोने आणि चांदीचा तोरा वाढल्याने देशभरातील लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. देशभरात सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. तर चांदीने पण पाठोपाठ झेप घेतली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमती वाढल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. रक्षा बंधनापूर्वी किंमती वधारल्या आहेत. सोन्या पाठोपाठ चांदीने पण मोठी झेप घेतली आहे. काय आहेत आता किंमती?

सोन्याच्या दरात मोठी वाढ

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,700 रुपयांनी वाढ झाली असून सोने पुन्हा एक लाख पार गेले आहे. सोन्याच्या भावात वाढ होऊन सोन्याचे दर 1 लाख 200 रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात 1 हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 1 लाख 13 हजार रुपयांवर पोहोचले आहे मात्र अमेरिकेन टॅरिफचे सावट असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी सोने-चांदीच्या किंमतीत वाढ

मंगळवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. इंडिया बुलियन असोसिएशननुसार, सोने प्रति 10 ग्रॅम 1,01,320 रुपयांवर आले आहे. तर सोमवारी हा भाव प्रति 10 ग्रॅमचा भाव 99,820 रुपये इतका आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्यात सातत्याने दरवाढ दिसून आली. अमेरिका आणि इतर देशांच्या टॅरिफ धोरणानुसार, अनेक बड्या गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यात सोन्याची सर्वाधिक किंमत 22 जून रोजी 100.82 रुपये प्रति औंस इतकी होती. 7 एप्रिल रोजी सोन्याची किंमत 87,100 रुपयांपर्यंत घसरली होती. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 0.79% वाढ झाली. सोने 3,362 डॉलर वर बंद झाले. MCX वर किंमती 1.98% वाढून 99,754 डॉलरपर्यंत घसरले.

दागिन्यांच्या हौसेवर पाणी

जळगावात सोन्याचे दर 1 लाख पार झाल्यामुळे आता दागिन्यांची हौस पूर्ण करता येणार नाही अस मत महिलांनी गृहिणींनी व्यक्त केलं आहे. एवढे झपाट्याने कधी सोन्याचे दर वाढतील असा विचार आणि कल्पनाच केलेली नव्हती. मात्र अचानक भाव वाढल्याने बजेट कोलमडले असल्याचे महिलांनी सांगितले. तर दरवाढीमुळे बहिणी सुद्धा नाराज झाल्या आहेत. भाऊरायांकडून आता महागडे गिफ्ट घेता येणार नसल्याने त्या खट्टू झाल्या आहेत.