Gold Price Today: ख्रिसमसच्या आधी सोनं आणखी झालं स्वस्त, वाचा आजचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या वायद्या सोन्यामध्ये 0.06 टक्के घसरण म्हणजेच 32 रुपयांनी घसरून 50,117 रुपए प्रति 10 ग्रॅम असा बाजार सुरू आहे.

Gold Price Today: ख्रिसमसच्या आधी सोनं आणखी झालं स्वस्त, वाचा आजचे दर
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 12:40 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे सोन्याच्या दरांमध्ये वारंवार घसरण झाल्याचं समोर येत आहे. आता ख्रिसमस (Christmas) आणि नववर्षाच्या तोंडावरही सोनं (Gold) स्वस्त झालं आहे. सलग तिसऱ्या दिवशी (Gold Price Today) भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. असं असलं तरी सोन्याचे भाव 50,100 रुपयांवर आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या वायद्या सोन्यामध्ये 0.06 टक्के घसरण म्हणजेच 32 रुपयांनी घसरून 50,117 रुपए प्रति 10 ग्रॅम असा बाजार सुरू आहे. (gold price today silver rates 24 december 2020 gold price falls silver up check todays price here)

या उलट चांदीच्या भावांत सलग तिसऱ्या दिवशी तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. मार्चच्या चांदीच्या किंमतींमध्ये 0.12 टक्क्यांनी वधारले आहेत. म्हणजेच भाव 80 रुपयांनी वाढून चांदी 67,656 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेड करत आहेत. सोनं स्वस्त झाल्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

तज्ज्ञांचे दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या तोंडावर शनिवार आणि रविवारच्या निमित्ताने सोने आणि चांदी दोन्हींमध्ये चढउतार होऊ शकतात. सोन्याचे भाव घसरून 49,900 रुपयांवर येऊ शकतात तर चांदी 66,600 रुपये दराने खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

यावर्षी सोन्याच्या किंमतीत 28 टक्क्यांनी झाली वाढ

यावर्षी सोन्याच्या किमतीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुढच्या वर्षी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होतच असल्याचे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, किंमतीमध्ये वाढ अजूनही सुरूच आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2150-2390 प्रति डॉलर औंसपर्यंत सोनं पोहचू शकतं. अशात आता अनेक देश हे उत्तेजन पॅकेज घोषित करण्याची तयारीत आहेत. यामुळे याचा परिणाम सोन्या-चांदींच्या किंमतींवर पाहायला मिळणार आहे.

सोन्याचे कालचे भाव

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचे भाव वाढल्याचं दिसून आलं. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांच्या वाढीसह 1,863.83 प्रति औंसवर पोहोचलं होतं. इतकंच नाहीतर यूएस गोल्ड फ्यूचरचा भाव 0.1 टक्क्यांनी घसरत 1,868.10 प्रति डॉलर औंसवर आला होता. खरंतर, अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या 900 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिल्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. (gold price today silver rates 24 december 2020 gold price falls silver up check todays price here)

इतर बातम्या –

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा आजचे दर

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: कोरोनाच्या नव्या ट्रेन्सनं सोन्याला झळाळी; जाणून घ्या तोळ्याचा भाव

(gold price today silver rates 24 december 2020 gold price falls silver up check todays price here)

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.