AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Crash Alert : आली रे आली मोठी बातमी आली…सोन्याबाबत वर्ल्ड गोल्डचा महत्वाचा इशारा; जापानी येन…

WGC Alert on Gold : सोन्याच्या घसरणाऱ्या किमतींवरून वर्ल्ड गोल्ड काऊन्सिनले रिपोर्टमधून महत्वाचा इशारा दिला आहे. इराण-अमेरिका संघर्ष, डॉलर-येनची स्थिती आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांचा सोन्यावर परिणाम होईल. आणखी काय म्हटलं आहे रिपोर्टमध्ये ? वाचा सविस्तर बातमी

Gold Crash Alert : आली रे आली मोठी बातमी आली...सोन्याबाबत वर्ल्ड गोल्डचा महत्वाचा इशारा; जापानी येन...
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचा सोन्याबाबात मोठा इशाराImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 05, 2026 | 11:35 AM
Share

Gold Rate Crash Prediction : यंदाच्या वर्षात सोन्याच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. विशेषतः इराण-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा सोन्याच्या बाजारावर मोठा परिणाम झाला. वर्षाच्या सुरुवातीला, 29 जानेवारी रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 1.76 लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर परिस्थितीत बदल झाला आणि सध्या सोन्याचा दर सुमारे 1.42 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतका खाली आला आहे. मात्र ही घसरण इथेच थांबणार नसल्याचे संकेत आता मिळत आहेत. कारण वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोन्याच्या किमतीबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालानुसार, जानेवारी 2026 मधील उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत आणखी 37 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत बाजारात जानेवारीपासून आजपर्यंत सोन्याचा दर जवळपास 34 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणारे किंवा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा अहवाल विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

सोन्याच्या दरांबाबत WGC चा इशारा काय ?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,857 डॉलर प्रति औंस या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलच्या खाली गेल्यास बाजारात मोठे करेक्शन सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत सोन्याचा पुढील महत्त्वाचा सपोर्ट 3,500 डॉलर प्रति औंस असेल. हा स्तर जानेवारी 2026 मधील सर्वकालीन उच्चांकी किमतीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के घसरण दर्शवतो. ही घसरण सोन्याच्या इतिहासातील मोठ्या करेक्शनच्या धर्तीवर असेल असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

WGC च्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे :

1) जानेवारी 2026 मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत सोन्यात 37 टक्क्यांहून अधिक घसरण होऊ शकते.

2) 3,857 डॉलर प्रति औंस हा महत्त्वाचा सपोर्ट तुटल्यास मोठ्या घसरणीचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

3) त्यानंतर पुढील मजबूत सपोर्ट 3,500 डॉलर प्रति औंस राहू शकतो.

4) जानेवारी 2026 मध्ये सोन्याने 5,070.21 डॉलर प्रति औंस हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

5) 5 ऑगस्ट रोजी स्पॉट गोल्डचा भाव 5,595.51 डॉलरच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून घसरून 4,127.96 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

6) लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) च्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 7.8 टक्क्यांची घसरण झाली आहे.

डॉलर ठरू शकतो निर्णायक

WGC च्या अहवालानुसार, सोन्याच्या किमतीतील घसरणीचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. जर सोन्याची किंमत 3,943 डॉलर प्रति औंस या स्तराखाली गेली, तर घसरण आणखी वेग घेऊ शकते, असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहीण्यात आलं आहे. त्यानंतर 3,857 डॉलरचा सपोर्ट तुटल्यास किंमत थेट 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

जपानी येनचा सोन्याला मिळणार आधार ?

सोन्याच्या किमतींवर केवळ भू-राजकीय परिस्थितीच नव्हे, तर जागतिक चलनबाजाराचाही मोठा प्रभाव असतो. विशेषतः अमेरिकी डॉलर आणि जपानी येन यांची दिशा सोन्याच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते. WGC च्या अंदाजानुसार, जर जपानी येन मजबूत झाला आणि अमेरिकी डॉलर कमकुवत झाला, तर सोन्याच्या किमतींना पुन्हा आधार मिळू शकतो.

याशिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयाकडेही संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे. फेडने अलीकडील बैठकीत व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. भविष्यातही व्याजदर स्थिर राहिल्यास डॉलरवर दबाव वाढू शकतो आणि त्याचा फायदा सोन्याला मिळू शकतो. मात्र व्याजदर वाढविण्याचा निर्णय झाल्यास सोन्यावर आणखी दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराण-अमेरिका संघर्ष ठरणार गेमचेंजर

सोन्याच्या किमतींचे भवितव्य मोठ्या प्रमाणात इराण-अमेरिका संघर्षाच्या पुढील घडामोडींवरही अवलंबून असेल. फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू झालेल्या तणावामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र आता हा तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत सुरू करण्याबाबत इराण सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. परिणामी महागाईवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर व्याजदर वाढविण्याचा दबावही कमी होईल.

जर व्याजदर वाढले नाहीत, तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पुन्हा गुंतवणूकदारांचा ओढा वाढू शकतो आणि सोन्याच्या किमतींना आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या बाजाराची दिशा ही इराण-अमेरिका संबंधांतील घडामोडींवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?