AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : इराण-इस्त्रायल युद्धविरामाची घोषणा आणि इकडे ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोन्याचा भाव गडगडला ना!

Gold Price Down : गेल्या 12 दिवसांपासून मध्य-पूर्वेत संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाविषयी अजूनही सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही दोन्ही देशात युद्ध बंदी झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर सोन्यात मोठी घसरण दिसली.

Gold Rate Today : इराण-इस्त्रायल युद्धविरामाची घोषणा आणि इकडे ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोन्याचा भाव गडगडला ना!
नुकताच युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा सुरू होऊन सीज फायर ची घोषणा झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे.Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 24, 2025 | 10:53 AM
Share

मध्य-पूर्वेतील इराण-इस्त्रायल या देशात मोठा संघर्ष सुरू आहे. युद्धविराम, युद्ध बंदीच्या हाकारे पिटण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देश युद्ध बंदीवर सहमती झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जाते. आता युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे.. त्याचा परिणाम जगभरातील भारतीय बाजारात दिसून आला. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसली.

MCX आणि सराफा बाजारात सोन्यात घसरण

जागतिक स्तरावर आणि भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. वायदे बाजारात MCX वर सोन्यात मंगळवारी 1226 रुपयांची घसरण झाली. सोने 98,162 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत 793 रुपयांची घसरण होऊन ती 105,966 रुपये प्रति किलोवर आली. तर किरकोळ बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसली.

तनिष्कच्या संकेतस्थळानुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,130 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरला. 23 जून रोजी हा भाव 1,01,180 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यात मामूली घसरण दिसली. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 92,700 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला. काल हा भाव 92,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

सोने दोन आठवड्यांच्या निच्चांकावर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला. स्पॉट गोल्डमध्ये 0.5% घसरण आली, ते 3,351.47 डॉलर प्रति औंसवर पोहचले. 11 जूननंतरचा दोन आठवड्यानंतरचा हा निच्चांक आहे.

युद्धबंदीवर गोंधळ कायम, सोने वधारणार?

युद्ध बंदीची अमेरिकेने घोषणा केली असली तरी दुसरीकडे इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनने क्षेपणास्त्र डागली. कतारशी संबंध कायम ठेवण्याचा आपला इरादा व्यक्त करत केवळ अमेरिकन तळावर हल्ला केल्याचे इराणने स्पष्ट केले. तर दुसरीकडे इस्त्रायलने इराणवर आजही तुफान हल्ला चढवला. त्यामुळे युद्धबंदीबाबतचा सावळगोंधळ दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.