
जळगाव सुवर्णपेठेत शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 99 हजार 704 रुपयांपर्यंत होते. सोमवारी दिवसभरात सोन्याचा भाव 3090 रुपयांनी घसरला. सोने प्रति 10 ग्रॅम 96 हजार 614 रुपयांपर्यंत घसरले. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. यापूर्वी सराफा बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सोन्याने एका आठवड्यात मोठी भरारी घेतली होती. तर सोमवारी एकाच दिवसात सोन्यात मोठी घसरण दिसली. या घसरणीमुळे ग्राहकांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळाली. आज सोन्याच्या भावात घसरण होण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे.
एकाच दिवसात 3090 रुपयांची घसरण
सोमवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 2266 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोने 97 हजार 438 रुपयांपर्यंत घसरले. तर सायंकाळी सोन्याच्या किंमतीत 824 रुपयांची घट झाली. सोने 96 हजार 614 रुपयांपर्यंत खाली आले. एकाच दिवसात सोने 3090 रुपयांनी उतरले. मंगळवारी पुन्हा किंमती कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 93,076, 23 कॅरेट 92,703, 22 कॅरेट सोने 85,258 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 69,807 रुपये, 14 कॅरेट सोने 54,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,095 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.