AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : India-Pak टेन्शनमुळे सोन्याला झळाळी, आठवडाभरात इतक्या हजाराने महागले, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?

India Pakistan Tension Gold Rate : भारत पाकिस्तानमध्ये 7 मे पासून ताणतणाव सुरू झाला. त्याचा परिणाम शेअर बाजारापासून ते व्यापार, उद्योगावर दिसून आला. या आठवड्यात सोन्याचा भाव इतका वधारला. सोने इतके महाग झाले. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?

Gold Rate : India-Pak टेन्शनमुळे सोन्याला झळाळी, आठवडाभरात इतक्या हजाराने महागले, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?
सोन्याने केली कमाल, भाव किती वाढलाImage Credit source: गुगल
| Updated on: May 11, 2025 | 4:36 PM
Share

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर धडक कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला. दोन्ही बाजूने ड्रोन, मिसाईलचा मारा दिसून आला. या वाढलेल्या ताण तणावात सोन्याने मोठी झेप घेतली. सोने प्रति 10 ग्रॅम 4000 रुपयांनी महागली. सीमेवरील तणावाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावर दिसून आला. त्यापूर्वी सोन्यात काही दिवस घसरण दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरच नाही तर स्थानिक सुवर्ण पेठेतही सोन्याच्या किंमतीत उसळी दिसली. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?

MCX वर असा बदलला भाव

वायदा बाजारात MCX वर सोन्याच्या किंमतीत बदल दिसला. 2 मे रोजी 5 जूनसाठी संभावित बाजारात 999 शुद्ध सोन्यासाठी वायदा किंमत 92,637 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर शुक्रवारी 9 मे रोजी सोन्याचा भाव वाढला. तो 96,535 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. एका आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 3,898 रुपयांनी महागले.

सराफा बाजारात किती वाढला भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 2 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भावा प्रति 10 ग्रॅम 93,954 रुपये इतका होता. तर 9 मे रोजी या किंमतीत वाढ दिसून आली. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 96,420 रुपयांवर पोहचली. म्हणजे गेल्या आठवडाभरात सोने प्रति 10 ग्रॅम 2466 रुपये महागले.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,420, 23 कॅरेट 96,282, 22 कॅरेट सोने 94,100 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 78,100 रुपये, 14 कॅरेट सोने 62,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,686 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.