Gold Price News : ज्या गोष्टीची भीती, तीच खरी ठरली! झरझर खाली सोन्याच्या किंमती, खरी ठरणार ती भविष्यवाणी?
Gold Price News : सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड झाली आहे. वायदे बाजारात 3% टक्के घसरून सोने 3,281.6 डॉलर प्रति औंसवर आले आहे. तर अमेरिकेत U.S. gold futures 3.7% घसरणीसह सोने 3,294.10 डॉलरवर बंद झाला.

सराफा बाजारात सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडला. एक नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. लग्न सराईत वाढलेल्या किंमतींनी वधू-वराकडील मंडळी चिंतेत सापडली आहे. अवघ्या दहा-बारा वर्षांपूर्वी काही हजारांवर असलेल्या सोन्याने इतकी मोठी झेप घेतल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच सोन्यात येत्या काही वर्षात मोठ्या घसरणीचे संकेत पण काही तज्ज्ञ देत आहेत. त्यांच्या मते सोने प्रति 10 ग्रॅम 55 हजार रुपयांपर्यंत खाली घसरणार आहे. त्याची चुणूक वायदे बाजारात दिसून आली. सोने तोंडावर आपटले. सप्तरथावर धावणारे सोने झटक्यात उतरले.
वायदे बाजारात मोठी झेप
एप्रिल महिन्यात सोन्याने मोठी झेप घेतली. वायदे बाजारात सोन्याची किंमत 900 डॉलरची तेजी दिसून आली. 900 डॉलरपैकी 500 डॉलरची लांब उडी या एप्रिल महिन्यातच सोन्याने घेतली. वायदे बाजारात सोने एक लाखांच्या जवळपास घोटाळले. पण त्याला मोठी मजल मारता आली नाही. सराफा बाजारात सोन्याने कहर केला आहे.
सोन्यात घसरणीला सुरुवात
गुरूवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. Spot gold 3% अंकांनी घसरून 3,281.6 डॉलर प्रति औंसवर आले. U.S. gold futures 3.7% घसरणीसह 3,294.10 डॉलरवर बंद झाला. घसरणीच्या एक दिवसाअगोदर सोने 3,500.05 च्या विक्रमी स्तरावर बंद झाले होते. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर जसा मजबूत होईल आणि डोनाल्ड ट्रम्प सरकारने नवीन टॅरिफ झटका दिला नाही तर सोन्याच्या किंमती झटपट खाली येतील. लवकरच सराफा बाजारातही सोने उतरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,085, 23 कॅरेट 95,700, 22 कॅरेट सोने 88,014 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 72,064 रुपये, 14 कॅरेट सोने 56,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,613 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
