AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : सोन्याची दमदार उडी, सर्व भाकीतं खरी ठरली! प्रति 10 ग्रॅम किंमती 1 लाखांच्या पार

Gold New Record : सोन्याने एक लाखांचा टप्पा पार केला. एप्रिल महिन्यातच सोने एक लाखांचा टप्पा पार करेल असेल भाकीत अगोदरच नोंदवले होते. ते खरे ठरले. या नवीन रेकॉर्डब्रेक किंमतींनी ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. अजून सोने मोठी भरारी घेण्याची भीती व्यक्त करत आहे.

Gold Rate Today : सोन्याची दमदार उडी, सर्व भाकीतं खरी ठरली! प्रति 10 ग्रॅम किंमती 1 लाखांच्या पार
सोन्याची मोठी उडीImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 22, 2025 | 8:49 AM
Share

सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. सोन्याने कालच प्रति 10 ग्रॅम एक लाखांचा टप्पा ओलांडला. सोने एक लाखांचा टप्पा ओलांडणार हे भाकीत अगोदरच व्यक्त करण्यात आले होते. अर्थात सोन्याच्या या किंमती जीएसटीसह आहेत. पण या रेकॉर्डब्रेक किंमतींनी ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या सोन्याच्या किंमती उच्चांकावर आहेत. यापूर्वीच जागतिक आणि देशातील तज्ज्ञांनी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर राहणार असल्याचा दावा केला होता. ट्रम्प धोरणामुळे सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,400 डॉलर/औंसवरून थेट 3,430 डॉलरच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या.

सोन्याने सोमवारी देशातंर्गत नवीन विक्रम नोंदवला. डॉलरच्या किंमतीत घसरण आल्याने आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, फेडरल रिझर्व्ह सोबत वाढलेल्या वादामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. अक्षय तृतीयेपर्यंत सोने अजून नवीन दर गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोन्याची मोठी मुसंडी

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती. सोने 2300 रुपयांच्या घरात महागले होते. तर सोमवारी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली. सोन्याच्या या दरवाढीने ग्राहक हैराण झाले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 90,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लकाकली

सोन्यासोबत चांदीने पण चांगलीच चमक दाखवली आहे. चांदीने पुन्हा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसात चांदीने दरवाढीचा चंग बांधला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,670, 23 कॅरेट 96,282, 22 कॅरेट सोने 88,550 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 72,503 रुपये, 14 कॅरेट सोने 56,552 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,242 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.