सोने आणि चांदीची किंमत आणखी स्वस्त, पटापट तपासा ताजे दर

सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 59 रुपयांची किंचित घट नोंदवण्यात आली. राष्ट्रीय राजधानीत आज 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने 46,038 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव घसरले आणि ते 1,756 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

सोने आणि चांदीची किंमत आणखी स्वस्त, पटापट तपासा ताजे दर
Gold Price Today
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:59 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 10,097 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदी 60,565 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली, तर चांदीच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही.

? सोन्याचा नवीन भाव

सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 59 रुपयांची किंचित घट नोंदवण्यात आली. राष्ट्रीय राजधानीत आज 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने 46,038 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव घसरले आणि ते 1,756 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

? चांदीची नवीन किंमत

चांदीच्या दरातही आज घसरण दिसून आली. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीचे भाव 196 रुपयांनी घसरून 60,369 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही आणि तो 22.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

? नवी दिल्ली ? सोने प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट 46,060 ? सोने प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 50,260 ? चांदी प्रति किलो 61,700

? मुंबई ?सोने प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट 45,940 ?सोने प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 46,940 ?चांदी प्रति किलो 61,700

? पुणे ?सोने प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट 45,170 ?सोने प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 47,000 ?चांदी प्रति किलो 61,700

? नाशिक ?सोने प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट 45,170 ?सोने प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 47,000 ?चांदी प्रति किलो 61,700

? नागपूर ?सोने प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट 45,940 ?सोने प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट 46,940 ?चांदी प्रति किलो 61,700

? सोने का घसरले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, वस्तूंच्या एक्सचेंजवर सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये घट झाल्याचा परिणाम सराफा बाजारातील सोन्याच्या किमतींवर दिसून आला.

?सणासुदीपूर्वी सोनं खरेदी करण्याचा सल्ला

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

?दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

?दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Gold Rate Today The price of gold and silver is even cheaper, check out the latest rates

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.