Gold Price Today : सोन्यात मोठी घसरण! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा भाव

| Updated on: Feb 21, 2023 | 10:10 AM

Gold Price Today : सोने चांदी खरेदीची लगबग करा, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. लग्नसराईमुळे येत्या काही दिवसात पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव गेल्या पंधरा दिवसांपासून स्वस्त आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या होत्या.

Gold Price Today : सोन्यात मोठी घसरण! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा भाव
आजचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने त्याच्या ऑलटाईम हाय पेक्षा स्वस्त दरात मिळत आहे. गेल्या दोन आठवड्याच्या घसरणीला सोमवारी सोने आणि चांदीने ब्रेक लावला. सोमवारी सोने (Gold Price) 426 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले तर चांदीच्या किंमती (Silver Price) 1260 रुपये प्रति किलोने वाढल्या. त्यानंतर सोन्याच्या भावात वाढ होऊन ते 56700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 65800 रुपये प्रति किलोच्या जवळपास विक्री झाले. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) व्याज दरात वाढ केली. त्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या आर्थिक आकड्यांमुळे वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत चढउतार होत राहील. शुक्रवारी वायदे बाजारात एप्रिल 2023 साठीच्या भविष्यातील सौद्यासाठी सोन्याची किंमत नीच्चांकी आहे. गेल्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याचे फ्युचर ट्रेड (Future Trade) कमी नोंदविण्यात आला आहे.

24 कॅरेट सोने 426 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 56601 रुपये झाले. 23 कॅरेट सोने 424 रुपयांनी वधारले. हा भाव प्रति 10 ग्रॅम 56374 रुपये, 22 कॅरेट सोने 391 रुपयांनी वधारुन प्रति 10 ग्रॅम 51847 रुपये, 18 कॅरेट सोने 320 रुपयांनी वाढून 42451 रुपये आणि 14 कॅरेट सोने 250 रुपयांनी वधारुन 33112 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

सोन्यात जोरदार घसरण झाली. सर्वकालीन उच्चांकानंतर सोने 2281 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. यापूर्वी सोने 2 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलटाईम हाय होते. यादिवशी सोने 58882 रुपये प्रति दस ग्रॅमवर पोहचले होते. चांदी, तिच्या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास 14220 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. चांदीचा ऑलटाईम हाय 79980 रुपये प्रति किलो आहे.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.