सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या तोळ्याचा दर…

| Updated on: Dec 04, 2020 | 7:46 PM

दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरुच आहे.

सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या तोळ्याचा दर...
Follow us on

नवी दिल्लीः दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात (Gold_Silver Price) घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरुच आहे. रुपयाच्या मजबुतीमुळे आणि जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीतील अस्थिरतेमुळे सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅमपाठीमागे (एक तोळा) 136 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे आज (शुक्रवार) 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार 813 रुपयांवर येऊन स्थिरावला. (Gold Silver price Down On Thursday bullion Market)

सोन्याबरोबरच चांदीच्या भावामध्ये देखील घसरण सुरु असलेली पाहायला मिळतीये. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, फक्त सोन्याच्या भावामध्येच नाही तर चांदीच्या भावामध्ये देखील घसरण सुरु आहे. प्रति किलोग्रॅम चांदीमध्ये 346 रुपयांची घसरण होऊन आजचा (शुक्रवार) चांदीचा बाजारभाव 63 हजार 346 रुपये इतका होता. म्हणजेच चांदीच्या दरात आज (शुक्रवार) 343 रुपयांची घसरण झाली.

दुसरीकडे देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळतीय. डॉलरच्या घसरणीमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतीय बाजारात ऑगस्ट महिन्यापासून सोने जवळपास 8 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 56 हजार 379 रुपये होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव राहिला होता. त्याच भावात आता घसरण होऊन 48 हजार 813 रुपयांवर आलाय. कोरोनाची लस (Corona Vaccine) येत असल्याच्या बातम्यांचा परिणाम सराफा बाजारावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण (Corona Pandamic) काळानंतर आता लोकांनी दिवाळीचं (Diwali) मोठं उत्साहात स्वागत केलं. कारण, धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली होती. IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात होती.

(Gold Silver price Down On Thursday bullion Market)

संबंधित बातम्या

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान