
सोनं आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate) चढ-उताराचा खो-खो सुरूच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दोन्ही मौल्यवान धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला, परंतु अचानक सोनं-चांदीचे भाव (Gold and Silver Price Crash) कोसळल्याचंही पहायला मिळालं. यानंतर, आता दोन्ही धातूंच्या किमतीत चढ-उतार होतच राहिले आहेत. गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या दिवशी, चांदीच्या किमती पुन्हा घसरल्या आहेत. (Silver Price Fall) एवढंच नव्हे तर सोन्याच्या किमतीतही बरीच घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. सर्वकालीन उच्चांकापेक्षा आता चांदी 1.59 रुपयांनी कमी दराने उपलब्ध आहे.
कुठपर्यंत घसरणार चांदीचे दर ?
गुरूवारी बाजार सुरू होताच चांदीच्या दराने सुळक्कन खाली घसरण घेतली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर 5 मार्टची एक्सपायरी असलेल्या चांदीचे दर आदल्या दिवशी 2,63,018 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मात्र आज (गुवार) बाजार उघताच तो आणि तो उघडताच खाली घसरून 2,60,453 रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की 1 किलो चांदीची किंमत एकाच झटक्यात 2 हजार 565 ५ रुपयांनी कमी झाली. काही तज्ञांचा अंदाज आहे की नजीकच्या काळात चांदी प्रति किलो 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल, मात्र ती पुन्हा वाढू सकते असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.
आता किती स्वस्त झाली चांदी ?
या वर्षी जानेवारीमध्ये चांदीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. 29 जानेवारी रोजी, इतिहासात पहिल्यांदाच चांदीचा भाव 4 लाख रुपयांच्या पुढे गेला आणि चांदीने 4,20,048रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. मात्र एवढी, सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर, आता या धातूच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत, 1 किलो चांदी आता1 ,59,595 रुपयांपर्यंत (Silver Cheaper) उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चांदीसोबत सोनंही घसरलंच
तर सोन्याच्या किमतीही घसरल्याने ग्राहक खुश आहेत. गुरुवारी कमोडिटी बाजारात व्यवहार सुरू झाल्यावर केवळ चांदीच्या किमतीत घसरण झाली नाही तर सोन्याच्या किमतीतही घसरण झाली आणि ती 1000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली.
आदल्या दिवशी, म्हणजेच बुधवारी, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी डेट असलेले 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 1,58,755 इतके रुपये होते. आणि आज सकाळी मार्केट सुरू झल्यावर सोन्याचे दर घसरून 1,57,701 रुपयांवर पोहोचले. म्ह
म्हणजेच सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1 हजार054 रुपयांची घसरण झाली.
चांदीप्रमाणेच, सोन्याच्या किमतीनेही 29 जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याच्या कमिती वायूवेगाने वाढू वेगाने वाढून 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या होत्या. मात्र नंतर हा धातू खाली घसरत राहिला. जर old Rate MCX Highशी तुलना केली तर किंमत सध्या उच्चांकापेक्षा 35,395 रुपयांनी कमी आहे.