Gold Rate Today : सोन्याने टेन्शन वाढवलं ना भाऊ, किमती धडाधड…आजचे 10 ग्रॅमचे दर..
Gold Rate Today 02 July 2026 Latest News Updates in Marathi: जागतिक बाजारातील घटनांचा प्रभाव सोन्याच-चांदीच्या दरावर होत असतो. आज 2 जुलै रोजी दिल्ली, मपुंबई, पुणे, चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती किती आहेत ते जाणून घेऊया.

देशभरात सोन्याच्या किमती 2 जुलै रोजी वाढलेल्या दिसल्या . बहुतांश शहरात सोन्याचे भाव आज चढेच आहेत. 2 जुलै रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत वाढून 1,40,920 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झालीये. तर मुंबईत 10 ग्रॅमचे दर हे 1,40,770 रुपये इतके आहेत. याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याचा भाव 1300 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 44, 500 रुपये झाला. जागतिक बाजारातील मंदी आणि डॉलरमधील मजबूतीमुळे सोन्याचे भाव दबावाखाली राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ खरेदी-विक्रीसाठीचे सोने) व्यवहार प्रति औंस 3,986.07 डॉलर्सवर होत आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव किती ?
देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,40,920 रुपयांना आणि 22 कॅरेट सोनं हे 1,29,190 रुपयांना मिळतंय. तर आर्थिक राजधानी मुंबई आणि कोलकातमध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव 1,29,040 रुपये आणि 24 कॅरेटचे दर हे 1,40,770 प्रति 10 ग्रॅम इचके आहेत.
देशात बघायला गेलं तर सोन्याचे सर्वाधिक दर हे चेन्नईत दिसून येत आहेत. तिथे 24 कॅरेटचं 10 ग्रॅण सोनं हे 1,44,560 रुपये किमतीला तर 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,29,040 रुपयांना मिळतंय. तसेच पुणे आणि बंगळुरूचे भावही समोर आले असून तिथे 24 कॅरेट सोनं 1,40,770 आणि 22 कॅरेट सोनं हे 1,29,040 प्रति 10 ग्रॅम या दराने विकत मिळतंय.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) |
| दिल्ली | 129190 | 140920 |
| मुंबई | 129040 | 140770 |
| अहमदाबाद | 129090 | 140820 |
| चेन्नई | 132510 | 144560 |
| कोलकाता | 129040 | 140770 |
| हैदराबाद | 129040 | 140770 |
| जयपुर | 129190 | 140920 |
| भोपाल | 129090 | 140820 |
| लखनऊ | 129190 | 140920 |
| चंदीगड | 129190 | 140920 |
चांदीची किंमत किती ?
सोन्याचे भाव तर चढलेच आहेत, पण चांदीची किंमत किती असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्याही किमतीत वाढ होत आहे. 2 जुलैच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलो 2,41,00 रुपयांपर्यंत वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘स्पॉट सिल्व्हर’चा भाव प्रति औंस 58 डॉलर्स इतका आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत भाव हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.