AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोन्याचा दिलासाच नाही, किमतींनी आणखी वाढवली धडधड; आजचे 10 ग्रॅमचे दर वाचून..

Gold Price Today 04 July 2026 Latest News Updates in Marathi : देशांतरगत सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम होत असतो. आज दिल्ली, मुंबई, चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर किती आहे, जाणून घेऊया सविस्तर..

Gold Price Today : सोन्याचा दिलासाच नाही, किमतींनी आणखी वाढवली धडधड; आजचे 10 ग्रॅमचे दर वाचून..
4 जुलै रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती ?
| Updated on: Jul 04, 2026 | 10:05 AM
Share

आठवडा संपत आला तरी सोन्याने काही ग्राहकांना दिलासा दिला नसून शनिवारीही देशातंर्गत सोन्याचे भाव चढेच राहिले. सराफा बाजारात मोठ्या घडामोडी घडत असून विविध शहरातील सोन्याचे भाव वाढले आहेत. 4 जुलैच्या सकाळी बहुतेक शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 -कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली. राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,160 रुपयांवर पोहोचला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 3300 रुपयांची वाढ होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,50,800 रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारल्यामुळे आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा भाव प्रति औंस 4,181.50 डॉलर्स इतका आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

राजधानी दिल्लीमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,160 रुपये आहे. तर 22-कॅरेट सोन्याची किंमत दर प्रति 10 ग्रॅम 1,34,910 रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक राजधानी मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम १,३४,७६०1,34,670 रुपये असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,47,010 मोजावे लागतील.

चकाकणाऱ्या सोन्याची किंमत चेन्नईमध्ये सर्वाधिक आहे. तिथे 24 कॅरेट सोनं 1,49,570 रुपये 22 कॅरेटचे सोनं 1,37,010 रुपयांना मिळतंय. पुणे आणि बंगळुरू ​​या दोन्ही शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,010 रुपये आहे आणि 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,34,760 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹)
दिल्ली 134910 147160
मुंबई 134760 147010
अहमदाबाद 134810 147060
चेन्नई 137010 149570
कोलकाता 134760 147010
हैदराबाद 134760 147010
जयपुर 134910 147160
भोपाळ 134810 147060
लखनऊ 134910 147160
चंदीगड 134910 147160

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी बाजाराच्या अपेक्षांच्या तुलनेत कमी कठोर (less hawkish) भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे व्याजदरात होणाऱ्या संभाव्य वाढीबाबतची चिंता कमी झाली आहे. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत असणे हा देखील व्याजदर वाढीच्या अपेक्षांना कमी करणारा आणखी एक घटक ठरला आहे.

चांदीचे दर किती

सोन्याप्रमाणेच, आणखी एक मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आह. शनिवार, 4 जुलैच्या सकाळी चांदीचा भाव वाढून प्रति किलो 2,50,100 रुपयांवर पोहोचला. औद्योगिक क्षेत्र आणि गुंतवणूकदार या दोघांकडूनही वाढलेल्या मागणीमुळे चांदीचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा भाव प्रति औंस 62.45 डॉलर्स इतका आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय