AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : धाडधाड कोसळले सोन्याचे दर, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; आज 10 ग्रॅमचा दर..

Gold Rate Today 07 July 2026 Latest News Updates in Marathi: : आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घटना घडताता, त्याचे परिणाम देशांतर्गत बाजारात होत असतात. सोनं चांदीचे वरखाली होणार हे दर, त्याचाच परिणाम असतात. आज, देशातील काही प्रमुख शहरांमध्ये 24 आणि 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती, ते जाणून घेऊया.

Gold Price Today : धाडधाड कोसळले सोन्याचे दर, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; आज 10 ग्रॅमचा दर..
| Updated on: Jul 07, 2026 | 9:12 AM
Share

Gold Rate Today in India : मागणीत आलेली सुस्त आणि डॉलरच्या मजबुतीमुळे, ज्यावर व्याज मिळत नाही , सोन्यासारख्या अशा मालमत्तांचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे. परिणामी सोन्याच्या दरात मंगळवारी मोठी घसरण दिसून आली. राजधानी दिल्लीत एका दिवस स्थिर राहिल्यानंतर, सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. या दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या (10 ग्रॅम) दरात 120 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली आहे. सोन्याची किंमत खाली आल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरेदीचा उत्साह वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे चांदीचा विचार करायचा झाला तर औद्योगिक क्षेत्रातील मंद मागणीचा या धातूवरही दबाव निर्माण झाला असून त्यामुळे चांदीची चमक देखील ओसरली आहे. दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात घसरण झाली आहे; या दोन दिवसांच्या कालावधीत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची घट झाली आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव घ्या जाणून

देशातील काही प्रमुख शहरात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर किती ते जाणून घ्या.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 
दिल्ली ₹1,46,760 ₹1,34,540 ₹1,10,110
मुंबई ₹1,46,610 ₹1,34,390 ₹1,09,960
कोलकाता ₹1,46,610 ₹1,34,390 ₹1,09,960
चेन्नई ₹1,47,920 ₹1,35,590 ₹1,12,990
बंगळुरू ₹1,46,610 ₹1,34,390 ₹1,09,960
हैदराबाद ₹1,46,610 ₹1,34,390 ₹1,09,960
लखनऊ ₹1,46,760 ₹1,34,540 ₹1,10,110
पाटणा ₹1,46,660 ₹1,34,440 ₹1,10,010
जयपुर ₹1,46,760 ₹1,34,540 ₹1,10,110
अहमदाबाद ₹1,46,660 ₹1,34,440 ₹1,10,010

दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीची स्थिती काय ?

चांदीच्या बाबतीत सांगायचे तर, दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी किमतीत घट झाली आहे. या दोन दिवसांत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची घसरण झाली आहे. या स्थिर कालावधीपूर्वी, 30 जून रोजी 5000 रुपयांची घट झाल्यानंतर, तीन दिवसांत चांदीचे भाव प्रति किलो 15000 रुपयांनी वाढले होते. आज दिल्लीत किंमत प्रति किलो 100 रुपयांनी कमी होऊन 2,44,900 रुपये झाली आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख महानगरांमध्येही ती याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीची किंमत जास्त असून प्रति किलो चांदीचा दर 2,49,900 रुपये इतका आहे. या चार प्रमुख महानगरांपैकी चेन्नईमध्येच चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु