Gold Rate Today : सोन्याने पुन्हा वाढवली धडधड, सलग दुसऱ्या दिवशी भाव चढेच; 10 ग्रॅम सोन्यासाठी..

Gold Rate Today 11 July 2026 Latest News Updates in Marathi : डॉलर कमकुवत झाल्यामुळे किमती धातूंची किंमत वाढली आहे. देशातील 10 प्रमुख शहरांमध्य आज 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव किती, ते सविस्तर जाणून घेऊया.

Gold Rate Today : सोन्याने पुन्हा वाढवली धडधड, सलग दुसऱ्या दिवशी भाव चढेच; 10 ग्रॅम सोन्यासाठी..
सोनं-चांदीची11 जुलै रोजी किंमत
| Updated on: Jul 11, 2026 | 9:40 AM

देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली असून, 11 जुलैच्या सकाळी बहुतेक प्रमुख शहरांमध्ये दर आणखी वधारले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,44,960 रुपयांवर पोहोचला असून, मुंबईत तो 1,44,830 रुपये आहे. डॉलरच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरांना आधार मिळाला आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,106.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. यापूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 400 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र यामुळे ग्राहकांचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. सोनं खरेदी करण्याचा विचार लांबणीवर टाकावा लागू शकतो.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

दिल्ली

24 कॅरेट: ₹1,44,960 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹1,32,910 प्रति 10 ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता

24 कॅरेट: ₹1,44,830 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹1,32,760 प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: ₹1,45,650 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹1,33,510 प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बेंगळुरू

24 कॅरेट: ₹1,44,830 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹1,32,760 प्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹) 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹)
दिल्ली 132910 144960
मुंबई 132760 144830
अहमदाबाद 132810 144880
चेन्नई 133510 145650
कोलकाता 132760 144830
हैदराबाद 132760 144830
जयपुर 132910 144960
भोपाळ 132810 144880
लखनऊ 132910 144960
चंदीगड 132910 144960

HSBC चा अंदाज काय?

HSBC ने 2026 साठी सोन्याची सरासरी किंमत 4,560 डॉलर प्रति औंस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी हा अंदाज 4,864 डॉलर प्रति औंस इतका होता. तसेच, 2027 मध्ये सोन्याची सरासरी किंमत 4,925 डॉलर प्रति औंस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बँकेच्या अंदाजानुसार, यंदाच्या उर्वरित काळात सोन्याचा दर 3,800 ते 4,700 डॉलर प्रति औंस या श्रेणीत राहू शकतो. वर्षाअखेरीस तो 4,750 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो, तर पुढील वर्षाच्या अखेरीस 5,025 डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

चांदीचेही वधारले भाव

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही तेजी कायम आहे. 11 जुलैच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,40,100 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव 59.54 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत सोने-चांदीच्या किमतींवर स्थानिक मागणी-पुरवठ्यासोबतच डॉलरचा दर, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही मोठा प्रभाव पडतो.

 

 

Follow Us