Gold-Silver Price Today 24 February 2026 : आज तरी खरेदीचा योग आहे की नाही ? 10 ग्रॅम सोन्याचे दर काय ? पटपट घ्या जाणून

Gold- Silver Rate Today 24 February 2026 Latest News Updates in Marathi : सोन्या-चांदीचे भरभक्कम दर पाहात, ते खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागतोय. आठव्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार उघडल्यावर MCX वर सोन्याचे भाव किती, आज सोनं खाली घसरलं की दर पुन्हा वर चढत आहेत? सविस्तर घ्या जाणून..

Gold-Silver Price Today 24 February 2026 : आज तरी खरेदीचा योग आहे की नाही ? 10 ग्रॅम सोन्याचे दर काय ?  पटपट घ्या जाणून
सोनं-चांदीचे दर
| Updated on: Feb 24, 2026 | 10:28 AM

Gold-Silver Price Today : मंगळवरचा दिवस जनसामान्यांसाठी खास ठरताना दिसत आहे. मार्केट उघडताच सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सोन्याची चमक थोडी फिकी पडली आहे. मजबूत अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी त्यांची चमक गमावली. टॅरिफी अनिश्चितता आणि अमेरिका-इराण तणाव यासारख्या घटकांनंतरही, बाजारावर डॉलरचा प्रभाव मजबूत राहिला. त्यामुळे सोनं आणि चांदीचेभाव वर न जाता, खाल घसरल्याचे पहायला मिळाले.

MCX वर काय परिस्थिती ?

MCX अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचें ऑफ इंडिया वर सोनं-चांदीची हालाल मंदावली. MCX गोल्ड एप्रिल फ्यूचर्स 0.50% पेक्षा जास्त घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी लाख 60 हजार 750 रुपये दर झाला. तर MCX सिल्व्हर एप्रिल फ्यूचर्स0.20 % घसरले आणि प्रती किलोसाठी दर 2 लाख 64 हजार 972 रुपये झाले. मंगळवारी सोन्याचा भाव सुमारे 700 रुपयांनी घसरला. मात्र, गेल्या व्यवहार सत्रात सोन्याचा भाव 3% वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 61हजार 500 रुपये झाला होता.
तर चांदीचा भाव 5% वाढून प्रति किलो 2,65,279 रुपये इतका होता. .

किरकोळ विक्रीतही दिसून आली घट

बुलियन वेबसाइटनुसार, 24 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1190 रुपयांनी घसरून 1, 60,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव प्रति किलोसाठी 2,64,740 रुपये इतका होता, म्हणजेच चांदीच्या दरात 1930 रुपयांची घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काय ?

24 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आला असला तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा धातू तेजस्वीपणे चमकताना दिसतोय. स्पॉट गोल्ड 1.49 टक्क्यांनी वाढून 5,183 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता, तर स्पॉट सिल्व्हर 3.21 टक्क्यांनी वाढून 87.3 डॉलर प्रति औंस असा व्यवहार करत होता.

डॉलर निर्देशांक सुमारे 0.20% वाढून 97.88 वर पोहोचला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं महाग झाल्याचं दिसून आलं.या कारणामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर परिणाम झाला आणि किमती घसरल्या. आता बाजार डॉलरच्या हालचाली आणि जागतिक भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे, त्यामुळे येत्या काळात सोने आणि चांदीची दिशा निश्चित होईल.